मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शिवरात्रीला या सात राशींचे जातक ठरतील भाग्यवान

महाशिवरात्री व्रत म्हणजे अत्यंत फलदायी आणि शुभ असे व्रत मानले गेले आहे. आणि योगायोग बघा की या वर्षी सोमवारी महाशिवरात्री असल्याने या अत्यंत दुर्मिळ योग जुळून आले आहे बघा. असे म्हटले जात आहे की 51 वर्षांनंतर इतका सुंदर योग बघायला मिळणार आहे. तर निश्चितच भक्तांनी या सोनेरी संधीचा लाभ घ्यायला हवा आणि महादेवाला प्रसन्न करून, त्याची आराधना करून इच्छित फळ प्राप्त करून घेण्याची ही योग्य वेळ आहे.
भौतिक असो वा आध्यात्मिक प्रगतीची इच्छा असो या दुर्मिळ योगात महादेवाची उपासना केल्याने निश्चित फायदा मिळेल. या व्यतिरिक्त 12 राशींपैकी सात राश्या अश्या आहे ज्यांना अगदी सोप्या पद्धतीने आराधना केली तरी निश्चित लाभ होणार आहे म्हणून संधी न चुकवता महादेवाचे दर्शन घ्यावे आणि कठिण व्रत संभव नसलं तरी महादेवाला केवळ दूध, दही धतुरा, खिरीचा प्रसाद, पांढरे फुलं, साखर या तून काहीही अर्पित केले तरी महादेव त्यांच्यावर निश्चित प्रसन्न होणार.
 
तर चला बघू या त्या सात रास ज्यांना घसघशीत लाभ होणार आहे.
 
पहिली रास आहे मेष. या राशींच्या जातकांना धन प्राप्तीची संधी आहे. धन प्राप्तीचे नवीन पर्याय या लोकाच्या समोर येतील यांना ती संधी गमवायची नाहीये. यांचे उत्पन्न वाढेल. नोकरीत असल्यास प्रमोशन मिळेल. नोकरी नवीन नोकरी मिळण्याची संधी तसेच व्यवसायात असणार्‍यांना धन लाभ होईल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असणार्‍यांसाठी देखील ही वेळ अनुकूल आहे.
 
दुसरी रास आहे कर्क, या राशीच्या जातकांना अगदी घर बसल्या धन लाभ होईल. या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी महादेवासह महालक्ष्मीची देखील पूजा करावी. कारण यांच्यावर देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होणार. दोघांची पूजा आराधना केल्याने यांना अनेक पटीने लाभ मिळेल.
 
तिसरी रास आहे कन्या, या राशीच्या जातकांनी पैशांची गुंतवणूक करावी. यांचे योग इतके प्रबळ आहे की जिथे कुठे हे गुंतवणूक करतील त्यांना अनेक पटीने परत मिळतील. आपण शेअर मार्केट, म्युचल फंड, रियल इस्टेट किंवा इतर कुठेही अगदी बिनधास्त पैस गुंतवू शकता. नक्की चांगले परिणाम हाती लागतील.
 
चौथी रास आहे तूळ, व्यापार असो वा नोकरी, वृद्धीचे योग निश्चित आहे. प्रमोशन किंवा दुसर्‍या जागी जास्त पगारावर नोकरी मिळण्याचे योग आहे. बेरोजगारांनी नोकरी मिळेल. उत्पन्न वाढेल तसेच जुन्या काही समस्या असतील तर त्यापासून देखील मुक्ती मिळेल.
 
पाचवी रास आहे धनू, या राशीच्या जातकांनी धनासंबंधी घेतलेला कोणताही निर्णय नक्कीच यशस्वी ठरणार आहे. विशेष म्हणजे जवळच्या माणसांकडून हा लाभ यांना मिळणार आहे. म्हणून यांना सल्ला आहे की यांनी सर्वांशी चांगले संबंध स्थापित करावे.
 
सहावी रास आहे कुंभ, कुंभ राशीच्या जातकांना कमी मेहनती धन लाभ होत असतो. अशात विचार करा की अधिक मेहनत केल्यास किती लाभ पदरी पडेल. म्हणून कुंभ राशीच्या जातकांना जरा मेहनत घेण्याची गरज आहे, असे केल्यास पैशाच पाऊस पडेल असे म्हटले तरी हरकत नाही. धन लाभाची संधी नक्कीच या राशीच्या जातकांच्या भाग्यात आहे.
 
सातवी रास आहे मीन, या राशींच्या जातकांना शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे दर्शन, व्रत, पूजा केल्याने अत्यंत लाभ मिळेल. हे लोकं तांडव स्रोत किंवा शिव सहस्रनामाचा पाठ देखील करू शकतात. असे केल्याने धन प्राप्तीचे प्रबळ योग आहेत तसेच नोकरी किंवा व्यवसायात यश मिळण्याचे योग दिसून येत आहे. कोर्ट कचेरीच्या कामात आपल्या बाजूने निर्णय लागण्याचे योग आहेत तसेच जुन्या काही समस्या असतील तर त्यातून सुटका मिळेल. एकूण ज्याही कामात हात घालाल यश मिळणे नक्की आहे. सकारात्मक परिणाम निश्चित मिळेल.
 
तर या सात राशींचे जातक महादेवाला प्रसन्न करून लखपती होऊ शकतात. यश मिळवू शकतात तसेच इतर राशींच्या जातकांनी देखील महादेव आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा करावी. सर्व भक्तांना मध्यम स्वरूपाचा फायदा तर नक्कीच मिळेल.