सोमवारची महाशिवरात्री अधिक फळ देणारी
यंदाची महाशिवरात्री माघ महिन्यातील 4 तारखेला अर्थात येत्या सोमवारी येत आहे.
सोमवार हा दिवस महादेवाचा मानला जातो. यंदा शिवरात्री सोमवारी आल्याने अधिक फलदायी महाशिवरात्री मानली जात आहे.
हिंदू ग्रंथानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुदर्शीला मध्यरात्री आद्यपरमेश्वर शिवलिंगच्या रूपात प्रकट झाले होते. काही विद्वान पंडीत या शुभकाळाला शिव-पार्वती विवाह तिथी मानतात. तर काहीच्या मते या रात्री भोळ्या शंकराने विषप्राशान केले होते. आध्यात्मात जीव आणि शिवाच्या मिलनची रात्र असा उल्लेख आला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी नदीवर स्नान करून शिवलिंगवर रुद्राभिषेक करून विधीवत पूजा केली जाते. पूज करताना एक लक्ष, एक हजार किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण केली जातात. दिवसभर उपवास करावा तर रात्री शिव भजनात जागरण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिरात सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून रात्रीच्या शेवटच्या प्रहरापर्यंत वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात रुद्राभिषेक, भस्म आरती, जलाभिषेक तसेच सुका मेवा, हलाव्याने शिवलिंगाचा श्रृंगार केला जातो.