रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (12:42 IST)

काय 2019 मध्ये नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान बनतील?

मोदी यांची वृश्चिक लग्नाची पत्रिका असून लग्नेश मंगळ आहे, जे लग्नातच स्थित आहे. लग्नेशचे लग्नात असणे एक फार मोठा प्लस प्वॉइंट आहे पण तसेच नीच राशीत स्थित चंद्र नीच भंग राजयोग बनवत आहे. आणि पंच महापुरुष योगाची गोष्ट केली तर मंगळ स्वराशीस्थ स्थित होऊन रूचक नवाचा योग बनवत आहे, हा योग अत्यंत शुभकारक मानण्यात आला आहे.  
 
एकादश भावात जेथे 6चा अंक आहे, तेथे सूर्य बुधाचे बुधादित्य योग लग्नात, चंद्र मंगळाचे महालक्ष्मी योग आणि चंद्र गुरुचा गजकेसरी योग तसेच गुरु शुक्राचे दृष्टिसंबंधाने बनलेला शंख योग आहे, तर नरेंद्र मोदी यांची पत्रिका अनेक विशिष्ट योगाने अलंकृत आहे आणि ज्याचे विश्लेषण तुम्ही स्वत: मोदींमध्ये करू शकता.  
 
जन्म पत्रिकेत अरिष्ट योग देखील स्थित आहे, एकादश भावात स्थित सूर्य आणि पंचम भावात स्थित राहूद्वारे बनलेला ग्रहण दोष तसेच बुध केतू यांचा दोष आणि बुधाची अस्त आणि वक्री स्थिति तसेच चतुर्थ भावात वक्री गुरु दशम भावात अस्तागत शनी याच अशुभ योगांमुळे येणारा काळ मोदी यांच्यासाठी त्रासदायक राहू शकतो.  
 
विंशोत्तरी दशा : मोदी यांच्या पत्रिकेत चंद्राच्या महदशे (28/11/2011 ते 20/11/2021 पर्यंत )त बुधाचा अंतर 29/09/2017 ते 28/02/2019 पर्यंत) श्रेष्ठ नव्हता, कारण चंद्र मनाचा व चंचलतेचा कारक आहे आणि बुध बुद्धीचा कारक आहे तर स्पष्ट आहे की बुद्धीत चंचलता श्रेष्ठ नसते ज्याचे स्पष्टीकरण केले तर इतक्यात काही निर्णय मोदी यांनी बुद्धीची चंचलतेमुळे घेतले आहे, कारण बुधाची स्थिती श्रेष्ठ नाही आहे. 
 
यांच्या पत्रिकेत बुध अस्त वक्री आणि राहूची पूर्ण दृष्टी बुधावर आहे. तसं तर बुधाची प्रत्यंतर दशा फेब्रुवारी 2019पर्यंत होती. त्यानंतर केतूची प्रत्यंतर दशा (28/02/2019 ते 28/09/2019 पर्यंत) सुरू आहे. केतू एकादश भावात स्थित श्रेष्ठ परिणाम प्रदान करेल, कारण कुठलाही क्रूर आणि पापी ग्रह पत्रिकेचे क्रूर भाव (तिसरे, सहावे, अकरावे) असेल तर आपल्या दशा-अंतर्दशेत श्रेष्ठ फलकारक असतात. वैदिक ज्योतिष्याचे मानले तर चंद्राच केतूचा अंतर ग्रहणदोषच्या समकक्ष परिणाम देतात म्हणून 2019 मध्ये मोदींना यश तर मिळेल पण त्यासाठी फार संघर्ष करावा लागणार आहे.  
 
गोचर स्थिति : 2019च्या सुरुवातीत यांच्या लग्न भावात (वृश्चिक)स्थित गुरु औसत परिणामकारक होते अर्थात जास्त अनिष्टकारी देखील नव्हते, तर शुभ फलकारक देखील नव्हते पण (10 एप्रिल ते 11 ऑगस्टपर्यंत) गुरु वक्री अवस्थेत गोचर करणार आहे, जो त्रास देऊ शकतो.  
 
द्वितीय भावात शनी, जो साडेसातीचा निर्माण करत आहे आणि या वेळेस अस्तागत स्थितीत आहे. कामात अडचण येण्याची शक्यता आहे. वर्तमानात राहू, केतूचे तृतीय आणि नवम दृष्टी संबंध तृतीय भाव संघर्षानंतर विजयाचे प्रतीक आहे. नवम भाव भाग्याचा प्रतीक आहे म्हणून  तृतीय भावाचा केतू विजय तर मिळवून देईल पण त्यासाठी फार संघर्ष करावे लागणार आहे, कारण नवम भावाचा राहू भाग्यात अडचण निर्माण करत असल्यामुळे भाग्याचा कदाचित साथ मिळणार नाही पण 6 मार्चपासून राहू, केतू ने राशी परिवर्तन केले आहे.  
 
राहूचा अष्टम भाव आणि केतू दुसर्‍या भावात स्थित असतील, पण राहू शनिवत आणि केतू मंगळाच्या समकक्ष परिणाम मिळवून देतील. यांच्या पत्रिकेत शनी तिसरे आणि चवथ्या भावाचा स्वामी आहे आणि शनी 30 एप्रिल ते 18 ऑगस्टपर्यंत वक्री अवस्थेत भ्रमण करत आहे जो यांच्या लग्न भावाच्या समकक्ष परिणाम देतील अर्थात वृश्चिक राशीत स्थित फळ देतील. मागील लोकसभा निवडणुकीत शनी यांच्या लग्नात स्थित होता, म्हणून त्याचे श्रेष्ठ परिणाम मिळाले होते. म्हणून शनीचे हे गोचर श्रेष्ठ फलकारक म्हणू शकतो. तसेच केतूचे मंगलवत परिणामांची गोष्ट केली तर 22 मार्च पासून मंगळ यांच्या सहाव्या भावात गोचर करत आहे, आणि हे प्रतिस्पर्धेत विजयाचे प्रतीक आहे.  
 
म्हणून दशा आणि गोचराचे विश्लेषण केल्यानंतर निष्कर्षाची गोष्ट केली तर 90% स्टार्स नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे पंतप्रधान बनण्याचे शुभ संकेत देत आहे. (या लेखात व्यक्त विचार /विश्लेषण लेखकाचे वैयक्तिक आहे. यात सामील तथ्य आणि विचार/विश्लेषण वेबदुनियाचे नाही आहे आणि वेबदुनिया याची जबाबदारी घेत नाही आहे.)

आचार्य पं. भवानीशंकर वैदिक