गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (08:13 IST)

कोणत्या रंगाची कार तुमच्यासाठी लकी ठरेल राशीनुसार जाणून घ्या

तुम्हीपण नवीन गाडी खरेदीचा विचार करत आहात का? जर हो तर तुम्ही गाडीसाठी नक्कीच रंगाची निवड केली असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की वाहन खरेदी करण्याअगोदर आम्हाला रंगांची विशेष खबरदारी ठेवणे गरजेचे आहे कारण या रंगाचा देखील आमच्या जीवनावर फार प्रभाव असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार रंगांमुळे आमचे भाग्य बनत आणि बिघडत ही म्हणून जर तुम्ही वाहन खरेदी करत असाल तर हे जाणून घेणे फारच गरजेचे आहे की कोणता रंग तुमच्यासाठी लकी ठरेल आणि कोणता अनलकी.

आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार हे सांगण्याचा प्रयत्न करू की कोणत्या रंगाची गाडी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. तर राशीनुसार जाणून घेऊ की कोणता रंग तुमच्यासाठी लकी आहे.

मेष:
मेष राशीच्या जातकांसाठी हलक्या रंगांचे वाहन शुभ ठरतात. तुम्ही पांढरा, हलका हिरवा किंवा गुलाबी रंगांचे वाहन खरेदी करू शकता. तसेच दुसरीकडे तुम्हाला काळ्या रंगांचे वाहन खरेदी करण्यापासून स्वत:चा बचाव करायला पाहिजे. या रंगाचे वाहन तुमच्यासाठी अनलकी ठरेल.

वृषभ:
वृषभ राशीच्या जातकांनी हलक्या रंगांचे वाहन खरेदी करायला पाहिजे कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे म्हणून तुमच्यासाठी पांढरा किंवा सिल्वर रंगाची गाडी विकत घेणे शुभ ठरेल.

मिथुन:
या राशीच्या जातकांसाठी डार्क रंग शुभ असतात म्हणून तुम्ही काळे, गुलाबी, लाल रंगाची गाडी खरेदी करू शकता. त्याशिवाय पांढर्‍या रंगांचे वाहन देखील तुमच्यासाठी उत्तम ठरतील.

कर्क:
तुम्ही निळा, पांढरा, डार्क हिरवा व पिवळा, यातून एखाद्या रंगाचे वाहन खरेदी करू शकता. हे सर्व रंग तुमच्यासाठी लकी साबीत होतील.
सिंह:
सिंह राशीच्या जातकांनी सूर्याशी निगडित रंगांचे वाहन खरेदी करायला पाहिजे जसे लाल, पिवळे इत्यादी. त्याशिवाय तुम्ही मेहरून रंगाचे वाहन खरेदी करू शकता.

कन्या:
तुमच्यासाठी सर्व रंगांचे वाहन लकी साबीत होतील खास करून पिवळा आणि हिरवा रंग शुभ ठरेल. तुम्ही याच रंगांचे वाहन स्वत:साठी निवडाल तर उत्तम राहिलं.

तुला: तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे म्हणून तुम्हाला पांढर्‍या रंगांच्या वाहनांची खरेदी करायला पाहिजे. डार्क निळ्या रंगांचे वाहन देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

वृश्चिक: या राशीच्या लोकांनी मिक्स रंग असणारे वाहनांची खरेदी करणे टाळायला पाहिजे. त्यांनी बँगनी, मेहरून, डार्क व हलका हिरवा रंगांचे वाहन खरेदी करायला पाहिजे.

धनू:
तुमच्यासाठी डार्क निळा, पिवळा किंवा नारंगी रंग फायदेशीर ठरेल म्हणून तुम्ही या रंगांचे वाहन खरेदी करा.

मकर:
तुमच्यासाठी डार्क रंग शुभ ठरतील. तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे म्हणून तुम्ही काळा, बँगनी, निळा किंवा ब्राऊन रंगाची गाडी विकत घ्या.

कुंभ:
या राशीच्या जातकांसाठी डार्क रंग शुभ असतात. काळा, निळा, बँगनी किव्हा हिरवा रंग वाहनासाठी शुभ ठरतो.

मीन:
तुमच्यासाठी हलके आणि डार्क दोन्ही रंग शुभ ठरतील तरी देखील तुम्ही जर हलका गुलाबी, पिळवा किंवा निळ्या रंगांचे वाहन खरेदी कराल तर ते तुमच्यासाठी लकी ठरतील. त्याशिवाय तुम्ही हिरव्या रंगाचे वाहन खरेदी करू शकता.