या लोकांनी सोनं घालू नये, अशुभ घडू शकतं
Gold can harm these people रत्न शास्त्रानुसार असे अनेक रत्न किंवा धातू आहेत ज्यांच्यामुळे एखाद्याच्या जीवनात चांगले बदल घडू येतात. एखाद्याला रत्नांमुळे सौभाग्य, राजयोग आणि चांगलं आरोग्य लाभतं तर एखाद्या जीवनावर याचा वाईट परिणाम होतो. रत्न शास्त्राप्रमाणे धातूंमध्ये सोने हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. सोने धारण केल्याने अनेक चमत्कारी फायदे मिळतात, यासोबतच व्यक्तीचे आयुष्यही अद्भुत बनते. प्रत्येकाला सोने आवडते कारण त्याची चमक आणि सौंदर्य लोकांना स्वतःकडे आकर्षित करते.
परंतु आपल्याला हे माहित आहे का सोनं धारण करताना कोणी हा विचार करत नाही की हे आपल्यासाठी योग्य आहे की नाही. खरं तर सोन्याचं आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असल्याचे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. तर चला आज जाणू घेऊया की कोणी सोनं धारण करावं आणि कोणी सोने घालणे टाळावं.
कोणत्या लोकांनी सोने घालावे
ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा धातू गुरु ग्रहाशी संबंधित आहे. असे मानले जाते की जे लोक सोन्याचे धातू धारण करतात त्यांच्या कुंडलीत गुरू ग्रहाची स्थिती मजबूत होते. यामुळे जीवनातील नकारात्मक प्रभाव कमी होतो. रत्न शास्त्रानुसार सोने आणि गुरू ग्रह धारण केल्याने खूप शुभ फल मिळतात. असे मानले जाते की जे लोक सोने परिधान करतात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. यासोबतच जीवनात सुख-समृद्धीसोबतच पैशाची कधीही कमतरता भासत नाही. जे लोक अंगठीच्या रूपात बोटात सोने धारण करतात, त्यांच्या कुंडलीतील तिसऱ्या घरावर गुरु ग्रहाचा प्रभाव पडतो. गळ्यात सोन्याची साखळी किंवा हार घातल्यास गुरू लग्न भाव प्रभावित करतं.
कोणत्या राशींच्या लोकांनी सोनं धारण करु नये
ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन, वृषभ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या जातकांनी सोन्याचे दागिने घालू नये. या राशीच्या लोकांसाठी सोने धारण करणे शुभ ठरतं नाही. यासोबतच तूळ आणि मकर राशीच्या जातकांनी सोनं धारण करणे अशुभ नसल्याने या दोन्ही राशीच्या लोकांना सोनं धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्न शास्त्रानुसार जे लोक कोळसा आणि लोखंडाचा व्यवसाय करतात त्यांनी सोनं घालणे टाळावे. अन्यथा त्यांच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.