1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (08:57 IST)

धन प्राप्तीचे संकेत देणाऱ्या या काही गोष्टी, दुर्लक्ष करू नका

जेव्हा आपल्यावर देवाची कृपादृष्टी होते ते संकेत आपल्याला कोणत्या न कोणत्या माध्यमाने मिळतात. शास्त्रानुसार हे असे काही संकेत असतात जे आपल्यासाठी शुभ असतात. चला तर मग जाणून घेऊया की असे कोणते संकेत आहे जी आपल्यासाठी फार शुभ आहेत आणि ज्यांचा दिसण्यामुळे आपल्याला सौभाग्य आणि समृद्धी प्राप्ती होते.
 
* अवयव फडफडू लागल्यावर -
आपल्या शरीराचे काही अवयव फडफडू लागले तर हे शुभ संकेत असतं. असे म्हणतात की आपल्या बाजूचा मध्य भाग फडफडल्यावर समजावे की येणाऱ्या काळात आपल्याला धनप्राप्ती होणार आहे. वास्तविक, या शरीराचे काही अवयव फडफडल्यावर धनप्राप्तीचे संकेत मिळतात. जर आपल्या बरोबर देखील असे काही घडत असल्यास समजावं की आपल्याला देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे.
 
* एखादा पोपट उडून आल्यावर -
आपल्या घरात एखादा पोपट उडून आला तर समजावं की आपले नशीब उजळणार आहे. खरं तर घरात पोपट येणं हे शुभ संकेत आहे. या शिवाय पोपटाचं बोलणं आणि आपले पंख फडफडवणं शुभ काळ येण्याचे लक्षण आहे. अशी घटना सौख्याशी निगडित असते.
 
* एखादी काळी मुंगी तोंडात तांदूळ आणताना दिसल्यावर -
आपल्या घरात किंवा घराच्या भोवती मुंग्या दिसणे ही एक साधारण बाब असू शकते. परंतू जर का एखाद्या काळ्या मुंगीच्या तोंडात तांदूळ दिसत असल्यास हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की लवकरच देवी लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आपल्या कडे धन प्राप्त होणार आहे.
 
* कपाळी पाल पडल्यावर -
पाल जिला अनेक लोक घाबरतात. घाबरण्यापेक्षा तिला बघूनच किळस येते. ती आपल्या कपाळावर पडल्यावर हे आपल्यासाठी घाबरण्याची नव्हे तर हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे. वास्तविक पाल कपाळावर पडणे धनप्राप्तीचे योग घेऊन येतं. काहीच असे भाग्यवंत असतात ज्यांचा कपाळावर पाल पडते.
 
* घरा समोर येऊन गाय हंबरणे - 
आपल्या हिंदू धर्मात गाय ही पूजनीय आहे. म्हणून आपल्या दारी गाय येणं हे शुभ संकेत आहे. असे म्हणतात की गाय आपल्या घरासमोर येऊन हंबरणे ऐकल्यावर समजावं की येणाऱ्या काळात आपणास धनप्राप्तीचा योग येतं आहे, आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास मिळणार आहे.
 
* टीप हा लेख निव्वळ आख्यायिकांवर आधारित आहे. हे केवळ आपल्या माहितीसाठी असून तथ्यांची अचूकता आणि पूर्णतेसाठी वेबदुनियाशी काहीही संबंध नाही.