मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:13 IST)

घरातून बाहेर करून द्या या 4 गोष्टी, नेहमी राहाल निरोगी

वास्तू विज्ञानाचा संबंध बांधकामाशी आहे. वास्तुनुसार कोणती वस्तू कुठे ठेवायची आहे याचा विचार केला जातो. कारण जर का घरात वास्तू दोष असेल तर घरात बरेच त्रास दिसून येतात. वास्तुनुसार घरात काही गोष्टी घडल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. ज्या लोकांच्या घरात औषधाचे ढीग लागलेले दिसतात आणि घरातील मंडळी सतत आजारी पडत असल्यास त्यांना वास्तुशास्त्राचे हे काही उपाय करायला पाहिजे.
 
* घरात भंगलेली किंवा खंडित मूर्ती नसावी - 
वास्तुनुसार घरात खंडित किंवा भंगलेली मूर्ती असणं वास्तू दोषाला वाढवतं. म्हणून घरातील देवघरात कधीही देवांच्या भंगलेल्या तसविरी आणि मूर्ती असायला नको. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ते आजाराने ग्रस्त होतात. जर आपल्या घरातील देवघरात अश्या काही मूर्ती किंवा तसविरी असतील तर त्यांना विसर्जित करा.
 
* स्वयंपाकघरात असे भांडे नसावे - 
वास्तू विज्ञानानुसार, स्वयंपाकघरात तुटलेले फाटलेले भांडे किंवा डबे ठेवू नये. स्वयंपाकघरात तुटलेले फाटलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यात बिगाड होतो. म्हणून हे फार महत्त्वाचे आहे की स्वयंपाकघरातील तुटलेलं आणि फुटलेलं सामान घरातून बाहेर काढावं. या जागी आपणास इच्छा असल्यास नवीन भांडी किंवा डबे आणावे. पण अश्या तुटलेल्या फाटलेल्या भांड्यांना त्वरित काढून टाका.
 
* घरात तुटलेलं डस्टबिन किंवा कचराकुंडी नसावी- 
वास्तू शास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेली कचराकुंडी नसावी. वास्तूचे नियम हे सांगतात की ज्या घरात कचराकुंडी तुटलेली असते त्या घरात आजारपण वाढतात. म्हणून घरात डस्टबिन किंवा कचराकुंडी तुटलेलीच नसावी, तर स्वच्छ देखील असावी.
 
* जुने वर्तमानपत्र आणि फाटलेले पुस्तके ठेवू नये - 
बऱ्याचदा असे आढळून येतं की घरात जुने वर्तमानपत्र आणि फाटलेले पुस्तके ठेवलेले असतात. हे वास्तू दोषाला कारणीभूत असतं आणि या मुळे घरात नकारात्मकता येते ज्यामुळे घरातील सदस्य आजारी पडतात. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की घरातून जुने वर्तमान पत्र आणि फाटलेले पुस्तके बाहेर काढून टाका. आपणास इच्छा असल्यास या पुस्तकांना आपण कोणा गरजूंना दान देखील देऊ शकता.