शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (10:42 IST)

आर्थिक स्थिती मजबूत होईल जर घरात वाहणार सकारात्मक ऊर्जा

प्रत्येकाची इच्छा असते की त्याचा घरात कोणत्याही प्रकाराची कमतरता भासू नये. त्यासाठी लोक धन प्राप्तीसाठी खूप मेहनत घेतात. पण सर्वतोपरीने प्रयत्न करून देखील घरात पैसेच राहत नाही. लोकांची ही तक्रार असते की त्यांचा घरात पैसे तर येतात पण ते त्यांना साठवून ठेवता येत नाही. कधी काही इच्छा नसून देखील अवांछित खर्च वाढतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडून जाते. घरात नकारात्मक ऊर्जा असल्याने देखील अशी परिस्थिती उद्भवते. पैसे साठवून ठेवण्यासाठी आणि घरात सौख्य आणि भरभराट नांदण्यासाठी आपण वास्तुचे काही सोपे उपाय अमलात आणू शकता.
 
* संध्याकाळी घरात दिवे लावावे - 
संध्याकाळच्या वेळी घरात दिवे लावावे. कारण अशी आख्यायिका आहे की संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते. संध्याकाळच्या पूर्वीच घराची स्वच्छता करावी. 

* जुनाट तुटलेली भांडी घरात ठेवू नये - 
वास्तुनुसार घरात कधीही जुनाट तुटलेल्या भंगलेल्या वस्तुंना ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून जर का आपल्या घरात कोणतीही वस्तू किंवा तुटकी भांडी असल्यास किंवा घरात कचरा साठला असल्यास, त्या कचऱ्याला ताबडतोब बाहेर काढून द्या.
 
* देऊळात किंवा घरात वाळके फुले ठेवू नये -
काही लोक पूजा करून शिळ्या फुलांना देऊळात किंवा देवाच्या निर्माल्यात असेच राहू देतात. परंतु वास्तुनुसार देवघरात वाळके फुले ठेवू नये, जर आपण घरात सजावटीसाठी फुले लावली असल्यास त्यांना देखील अधून मधून बदलत राहावं. नेहमी ताजे फ़ुलं लावावे. वाळकी आणि शिळलेली फुले घरात नकारात्मकता आणतात.
 
* फरशी पुसण्याचा पाण्यात थोडं मीठ मिसळा -
पाण्यात थोडं मीठ मिसळा आणि त्याने फरशी पुसावी. या मुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील एखाद्या भागात वास्तू दोष असल्यास तिथे स्फटिकाचे दगड ठेवावं किंवा एका भांड्यात समुद्री मीठ किंवा मीठ ठेवावं.
 
* मुख्य दारावर स्वस्तिक चिन्ह बनवा -
जर आपले मुख्य दार दक्षिण-पश्चिम (नेऋत्य) दिशेला असल्यास कामात अडथळे येतात. मुख्य दाराचे वास्तू दोष ठीक करण्यासाठी मुख्य दाराच्या भिंतीवर तांब्याचे स्वस्तिक लावा. स्वस्तिक हे शुभ चिन्ह मानले गेले आहे. मुख्य दारावर दिवा लावा, यासाठी आपण पिवळ्या रंगाचा बल्ब लावू शकता.
 
* झोपण्याच्या खोलीत किंवा पलंगावर बसून जेवू नये - 
कधीही झोपण्याचा खोलीत किंवा पलंगावर बसून जेवण करू नये. या मुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. जेवताना आपले तोंड उत्तरेकडे ठेवा. या मुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.