1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (08:46 IST)

गुलाबाचे फुल तुमचे नशीब बदलू शकतं, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित उपाय

लोकांना त्यांचे घर गुलाबाच्या फुलांनी सजवायला आवडतं. यामुळे घराचे सौंदर्य आणखीनच वाढतं. तर दुसरीकडे वास्तूनुसार गुलाबाशी संबंधित काही उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. तर चला त्याबद्दल जाणून काही विशेष माहिती जाणून घेऊया...
 
इच्छा पूर्ण करण्यासाठी
इच्छित फळ प्राप्त करायचे असेल तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या मंगळवारी हनुमानजींना 11 ताजे गुलाबाचे फूल अर्पण करावे. हा उपाय सलग 11 मंगळवार करा. धार्मिक मान्यतांनुसार संकटमोचन हनुमानजी यामुळे प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात.
 
भरभराटीसाठी
मंगळवारी लाल कपड्यात लाल गुलाब, लाल चंदन आणि रोळी बांधून हनुमान मंदिरात आठवडाभर ठेवा. यानंतर ते उचला आणि तुमच्या घराच्या किंवा कार्यक्षेत्राच्या तिजोरीत, कपाटात किंवा पैसे साठवण्याच्या ठिकाणी ठेवा. असे मानले जाते की या उपायाने पैशाची समस्या दूर होते आणि घरात समृद्धी राहते.
 
फायद्यासाठी
शुक्रवारी संध्याकाळी गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा ठेवून त्याला जाळा. ते जाळल्यानंतर लक्ष्मीला फुले अर्पण करा. असे मानले जाते की या उपायाने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि धनलाभाचे योग निर्माण होतात.
 
रोग बरा करण्यासाठी
पानात गुलाबाचे फूल आणि बत्ताशे ठेवून ते रुग्णाच्या वरून 11 वेळा ओवाळून चौरस्त्यावर फेकून या. असे म्हटले जाते की यामुळे आरोग्यामध्ये लवकर सुधारणा होते. पण त्याच वेळी औषधे घेत रहा.
 
कर्जातून बाहेर पडण्यासाठी
5 लाल गुलाबाची फुले घ्या. यातील 4 फुले पांढऱ्या कापडाच्या चार कोपऱ्यात बांधा. यानंतर, पाचवे फूल कापडाच्या मध्यभागी ठेवा. तयार बंधारा वाहत्या नदीत फेकून द्या. त्यामुळे कर्जमुक्ती होते, असे मानले जाते. यासोबतच घरात सुख, समृद्धी, शांती आणि भरभराटी राहते.