गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

नशीब पालटण्यासाठी 4 सोपे उपाय

सकाळी लवकर उठणे
जर आपण सकाळी उशिरा झोपून उठत असाल तर आपलं सूर्य निश्चित कमजोर होईल ज्यामुळे आपले अधिकारी किंवा बॉस नक्कीच काही अनपेक्षित बोंबा ठोकतील. प्रमोशन थांबण्याची शक्यता असते. पहाटे लवकर उठल्याने सूर्यासोबतच पितर प्रसन्न होतात आणि सर्व प्रकाराच्या अडचणी दूर होतात.
 
आहाराप्रती सजग राहा
धावपळीच्या नादात सर्वात अधिक दुर्लक्ष होतं ते आहाराकडे. नियमित वेळी आहार न घेतल्याने प्रेतदोष लागतो, पितृदोष लागतो आणि आपण आजारी होऊ शकता. याने धनाचे हनन होऊ शकतं. स्थिर स्थानी बसून शांतपणे आहार घेतल्याने देवता प्रसन्न होतात, राहू दोष कमी होतं ज्याने प्रगती होते.
 
अभिवादन आवश्यक आहे
आपल्यापेक्षा लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यक्तीचे अभिवादन करणे आवश्यक आहे. याने बृहस्पती आणि शनी व्यवस्थित राहतात आणि जीवनात कधीही दुर्भाग्या सामोरा जावं लागत नाही.
 
घरी येताना रिकाम्या हाती येऊ नये
घरातून रोज बाहेर पडत असाल तेव्हा घरी परत येताना रिकाम्या हाती येऊ नाही. रोज घरी येताना काही लहानशी का नसो पण खरेदी करत आल्यास घरात बरकत राहते, कटकटी दूर होता आणि घरात प्रेमाचे वातावरण राहतं.