घरात कासव कुठे ठेवायला हवे, जाणून घ्या शुभ संकेत
फेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात कासवाची उपस्थिती शुभ व लाभकारी मानली जाते. कासव मनात शांती आणि जीवनात धन आणण्यात मदत करतं. फेंगशुईप्रमाणे घरात कासव ठेवल्याने घरातील सदस्यांचे वय वाढतं आणि सौभाग्य प्राप्ती होते, म्हणून घरात आणि ऑफिसमध्ये कासव ठेवणे शुभ मानले गेले आहेत.
फेंगशुई नियमांप्रमाणे कासव कधीही बेडरूममध्ये ठेवू नये. कासवासाठी सर्वांत योग्य ठिकाण घरातील बैठक अर्थात ड्राइंग रूम आहे.
केवळ शोभा वाढवण्यासाठी दोन कासव ठेवू नये. दोन कासव ठेवल्याने फायद्यात बाधा येते. कासवासाठी सर्वात उत्तम दिशा उत्तर आहे. उत्तर ही धनाची दिशा मानली गेली आहे. उत्तर या दिशेव्यतिरिक्त पूर्वीकडेही कासव ठेवू शकतो.
कासवाचा चेहरा घरातील आतल्या बाजूला असावा. बाहेरच्या बाजूला तोंड असल्यास ज्या गतीने पैसा घरात येतो त्याच गतीने खर्चही होऊन जातो.
कासवाला एखाद्या पॉटमध्ये पाणी भरून ठेवले पाहिजे.
सात धातूने निर्मित कासव वास्तू दोष दूर करतं आणि याची पूजा केली जाते. याने घरात शांती आणि सद्भावाचे वातावरण राहतं.
कासव दक्षिण-पूर्व दिशेत ठेवावे. कासवाच्या पाठीवर सात धातूने निर्मित सर्व सिद्धी यंत्र साहस व समृद्धी प्रदान करतं.