रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

बुधवार घरी आणा या वस्तू, ज्ञान वाढेल, भरभराटी येईल

प्रत्येक व्यक्ती कर्म करतं असतो परंतू अनेकदा फल प्राप्ती होत नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी शिक्षण, बौद्धिक स्तर अर्थातच ज्ञान आवश्यक आहे. बुद्धदेव हे बुद्धी प्रदान करतात. बुधवारी बुद्ध देवाला प्रसन्न केल्याने बुद्धी, बळ आणि पगारात वाढ किंवा व्यवसायात वृद्धी असे लाभ प्राप्त करता येऊ शकतात. बुद्ध देवाला बुधवार आणि हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग शुभता आणि हिरवळ याचे प्रतीक आहे. आणि जीवनात हिरवळ असावी म्हणून बुधवारी या वस्तू घरी आणाव्या.
 
साबूत मूग डाळ
हिरवी कोथिंबीर
पालक किंवा इतर हिरव्या पालेभाज्या 
मिठाचे शंकरपाळे
हिरवी मिरची
पपई
पेरू
 
तर हे तर होते खाद्य पदार्थ या व्यतिरिक्त बुधवारी स्टेशनरी, कला क्षेत्रात कामास येणार्‍या वस्तू जसे म्युझिक संबंधी, स्पोर्ट्स संबंधी तसेच वाहन किंवा घराच्या सजावटी संबंधी सामान खरेदी करणे योग्य ठरेल. या व्यतिरिक्त भांडी, तांदूळ, औषधं, ज्वलनशील वस्तू जसे गॅस-लाकूड, एक्वेरियम खरेदी करणे ही शुभ ठरेल.