बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (10:55 IST)

Gemstone कोणता रत्न कोणत्या रोगासाठी धारण करावा

भाग्य उन्नतीसाठी सहायक असणारे रत्न कुंडलीप्रमाणे धारण केले तर रोगांनाही मात देऊ शकतात. आयुर्वेदामध्ये रत्नाची राखद्वारे रोगांवर उपचार केला जातो. रत्नांमध्ये ग्रहांची ऊर्जा असते ज्याने धारण करणार्‍याला शक्ती मिळेल. म्हणूनच रोगाप्रमाणे रत्न धारण करावे:
 
1. पन्ना - चांगल्या स्मृतीसाठी धारण करावं.
2. नीलम - संधिवात, अपस्मार, उचकी येणे आणि नपुंसकत्व नष्ट करतं.
3. फिरोजा - दैवी संकट टाळण्यासाठी धारण करावं.
4. मरियम - मूळव्याध किंवा वाहणारे रक्त थांबवण्यासाठी.
5. माणिक - रक्त वृद्धीसाठी.
6. मोती - ताण आणि स्नायू रोगांसाठी.
7. किडनी स्टोन - किडनी रोग उपचारासाठी.
8. लाडली- हृदयरोग, नजर रोग किंवा मूळव्याध दूर करण्यासाठी.
9. मूंगा, मोती - पुरळांसाठी हे धारण करावे.
10. पन्ना, नीलम, लाजवर्त - पेप्टीक अल्सरमध्ये उपयोगी.
11. पुष्कराज,लाजावर्त्त, मूनस्टोन - दातांसाठी.
12. माणिक, मोती, पन्ना - डोकेदुखी साठी.
13. गोमेद या मून स्टोन - घसा खराब असल्यास.
14. माणिक, मूंगा, पुष्कराज - नेहमी सर्दी, खोकला, ताप येत असल्यास धारण करावे.
15. मूंगा, मोती, पुष्कराज, फिरोजा- अपघातापासून वाचण्यासाठी किंवा वारंवार अपघात होत असल्यास धारण करावे.
16. तांबे की चेन - डांग्या खोकल्यासाठी. 
17. मूंगा, मोती, पन्ना - मोतीबिंदूची तक्रार असल्यास मूंगा, मोती, पन्ना एकाच अंगठीत घालावे.
18. मूंगा, पुष्कराज- बद्धकोष्ठतेत आरामासाठी.
19. पन्ना, पुष्कराज, मूंगा- मेंदू अर्बुद उपचारासाठी पन्ना, पुष्कराज, मूंगा, हे तिन्ही एकाच अंगठीत धारण करावे.
20. मोती, पुष्कराज - हर्नियासाठी चांदीच्या चेनमध्ये धारण करावे.
 
रत्न धारण केल्याने अनेक रोगांवर उपचार होतो. पण कोणतेही रत्न चांगले व वाईट दोन्ही परिणाम प्रदान करणारे असतात. म्हणून अधिक सुखफल प्राप्तीसाठी आपली कुंडली एखाद्या प्रतिष्ठित ज्योतिषाला दाखवून रत्न धारण करावे.