अभ्यास करण्याची क्षमता अनेक पटीने वाढविण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या

exam
परीक्षेचा काळ जस जस जवळ येतो, अभ्यासासाठी जास्त वेळ देण्याची गरज वाढू लागते. कारण शेवटच्या महिन्यात संपूर्ण सिलॅबस पुन्हा करावा लागतो. ज्या मुळे सामान्य दिवसांपेक्षा जास्त वेळ द्यावा लागतो. एखादा विध्यार्थी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, एसएससी, बँकिंग किंवा आयएएस सारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असल्यास त्याला 10 ते 12 तास अभ्यास करावा लागतो. कोणत्याही परीक्षेसाठी
बराच काळ अभ्यास करणे कठीण आणि तणावाचे असू शकत. बऱ्याच वेळा मुलं 10 ते 12 तास अभ्यास करून देखील अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकण्यास असमर्थ होतात. आज आम्ही सांगत आहोत अभ्यासाच्या काही पद्धतींबद्दल ज्यांना शिकून आणि अवलंबवून आपण अभ्यासाच्या पद्धतीत बदल आणून आश्चर्यकारक फायदे मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. अभ्यासाच्या काही खास पद्धतीं बद्दल.

1
आपल्या शरीराला घड्याळ समजून अभ्यासाची वेळ ठरवा.

प्रत्येक मानवाच्या शरीरात वेगवेगळे घड्याळ असतात. जर याचा संबंध अभ्यासाशी ठेवत असल्यास सोप्या शब्दात समजा की संपूर्ण 24 तासाच्या काळात एक असा काळ येतो जेव्हा आपल्या शरीरातील कार्य क्षमता शिगेला येते. त्या वेळी आपण अधिक चांगल्या पद्धतीने आपले काम करू शकतो काही मुलांना सकाळी वाचलेले अधिक चांगले समजते तर काही मुलांना रात्री वाचलेले अधिक चांगले समजते आणि लक्षात राहते. तर कोणत्याही परीक्षेच्या तयारीच्या पूर्वी आपल्या शरीरातील घड्याळीचे विश्लेषण करा.

2 दुसऱ्या दिवशीची योजना रात्रीच बनवा-
काही विद्यार्थी सकाळी उठून कोचिंग आणि शाळेत जातात. काही लोक जे ऑफिसात जातात ते देखील स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. त्यांना सकाळी ऑफिसात जावं लागत. अशा परिस्थितीत दररोज काहीही योजना ना बनविता अभ्यास कराल तर काहीही मिळणार नाही आणि आपण गोंधळून जाणार.असं होऊ नये या साठी आपण कोणतेही काम करण्यापूर्वी योग्य योजना आखणे हे सर्वात महत्वाची पायरी आहे. जर आपल्याला कोणतीही परीक्षा एका वर्षातच उत्तीर्ण करावयाची आहे तर या साठी आपल्याकडे संपूर्ण वर्षाची किंवा एका महिन्याची योजना असायला पाहिजे. तस तर संपूर्ण वर्षाचा किंवा प्रत्येक महिन्याची योजना फक्त एक ब्लू प्रिंट असते. दुसऱ्या दिवशी काय करावयाचे आहे या साठी सर्वात महत्वाचे आहे ह्याची संपूर्ण योजना रात्रीच बनवावी. दुसऱ्या दिवशी निश्चित करावे की आपण रात्री आखलेल्या योजनेनुसार लक्ष पूर्ण करण्यात सक्षम आहात की नाही.
आपण सकाळी लवकर
पहाटे(4-5 वाजता)उठून अभ्यास करता तर 11 वाजे पर्यंत आपले सर्व काम पूर्ण होऊन अभ्यासासाठी देखील पुरेसा वेळ मिळेल.


3 अभ्यास तंत्राचे मिश्रण वापरा-
काही लोक असं म्हणतात की सकाळी लवकर उठून आणि रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करून देखील
अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नाही. तर त्या लोकांनी अभ्यासाच्या तंत्रावर लक्ष दिले पाहिजे. आजकाल व्यस्तता एवढी वाढली आहे की फक्त नोट्स बनवून अभ्यास करण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण वेगवेगळ्या तंत्र ज्ञानाचे वापर करू शकता. आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये एखादे डायग्राम किंवा मॅप्सची छायाचित्रे सेव्ह करू शकता आणि गरज पडल्यास ते बघू शकता. बस किंवा रेल्वेने प्रवास करण्याच्या दरम्यान आपण ही पद्धत अवलंबवू शकता ही पद्दत खूप उपयुक्त आहे. अभ्यासाच्या इतर काही पद्धती देखील आपण तंत्रज्ञानाने शिकू शकता.

4 अभ्यासाची कालावधी लक्षात ठेवा-
अभ्यास करताना किंवा अभ्यासाचे नियोजन करताना अभ्यासाच्या कालावधीला लक्षात ठेवा. काही लोक 1-2 तास सहज अभ्यास करतात तर काही लोकांना 1 तास देखील अभ्यास करणे अवघड जात. या लोकांना अभ्यासाच्या दरम्यान थोड्या थोड्या वेळ विश्रांती घेणे किंवा वरील दिलेल्या अभ्यास तंत्राचे मिश्रण करणे महत्त्वाचे आहे. अभ्यासाची संपूर्ण योजना आखताना या विश्रांतीच्या वेळेला दुर्लक्षित करू नका. अभ्यास योजना आपण आपल्या क्षमतेनुसार बनवावी. जर आपण आज 1 तासच अभ्यास करीत आहात तर 1 महिन्यानंतर काही जादू होणार नाही की आपण 6 - 9 तास अभ्यास करायला सुरुवात कराल.

5 शारीरिक व्यायाम आणि मेंदूला वाढवणारे आहार घ्या-कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची
तयारी करताना किंवा सुरु करणार असाल तर सर्वप्रथम चहा, कॉफी आणि फास्टफूडला शक्य तितक्या लवकर निरोप द्या. असं म्हणतात की एका निरोगी शरीरातच निरोगी मन असत. जर एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा बऱ्याच आजाराने ग्रस्त आहेत तर तो आपल्या मनाला एकाग्र करू शकत नाही. या मुळे त्याचा थेट परिणाम त्याच्या परीक्षेवर होईल. म्हणून एकाग्रता सुधारण्यासाठी शारीरिक व्यायाम आणि निरोगी आहार घेणं महत्वाचे आहे. वॉक करणे, जम्पिंग जॅक्स, धावणे सारखे हलके एरोबिक व्यायाम केल्यानं मेंदूत ऑक्सिजन चे प्रमाण वाढते आणि आपण एकाग्रतेने अधिक वेळ अभ्यास करू शकता.
अवाकाडो, बोर, ब्रोकोली, मोड आलेले शाबूत कडधान्य, मासे,आणि भोपळ्याचे बियाणं हे असे काही खाद्य पदार्थ आहे ज्यांना खाऊन आपल्या कार्य क्षमतेवर चांगला प्रभाव पडेल.

आपण बोर्ड परीक्षा देत आहात किंवा इतर कोणतीही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत आहात वरील दिलेल्या पद्धतींना अवलंबवून आपल्याला चांगले परिणाम मिळतील. सुरुवातीला या पद्धती अवलंबवून थोड्या अडचणींना सामोरी जावं लागू शकत. परंतु थोड्या कालांतराने यश नक्की मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जितका देखील अभ्यास करा आणि जेव्हा देखील करा तो पूर्ण एकाग्रतेने करा. या मुळे आपल्याला यश नक्की मिळेल.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

अनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा

अनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे. देशातही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू ...

World Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार ...

World Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहे जाणून घ्या
21 जून 2021 रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार .योगातील आसन काय आहेत, आसन कशाला म्हटले ...

चविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड

चविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड
जर आपल्याला गोड खाणं आवडत तर या वेळी साबुदाण्याचे फ्रुट कस्टर्ड बनवा. हे खाण्यात चविष्ट ...

कातर वेळचा गार वारा

कातर वेळचा गार वारा
कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा

हललें जरासें चांदणे

हललें जरासें चांदणे
हललें जरासें चांदणें भरल्या दिशांच्या पापण्या, होतील वर्षे मोकळी हरवून त्या साऱ्या ...