मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (16:33 IST)

गर्भधारणा साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या ८ गोष्टी अवश्य टाळा

गर्भधारणेचा प्रयत्न करणे आणि मूल होण्याचा विचार करणे ही तुमच्या आयुष्यातील एक मोठी पायरी आहे. ही एक मोठी जबाबदारी असून त्यासाठी चांगली तयारी आवश्यक आहे. गर्भधारणा सध्या करण्यासाठी आणि बाळाला यशस्वीरीत्या जन्म देण्यासाठी आपण आपले शरीर तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही गरोदर राहण्यासाठी योजना आखत असाल तर या काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. 
1. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा: फ्रेंच फ्राईज, तळलेले कांद्याचे रिंग, चिकन नगेट्स ई. खाण्यास चविष्ट जरी असले तरी, ही पदार्थ गर्भधारणेची योजना आखत असाल तर न खाल्लेलेच बरे. गर्भधारणेसाठी तुमचे शरीर निरोगी असणे गरजेचे आहे, मात्र प्रक्रियायुक्त पदार्थ खालल्यामुळे शरीरात जळजळ निर्माण होते. फळे आणि भाज्या यांसारखे निरोगी पदार्थ शरीरारील दाहक पातळी कमी करण्यास मदत होते, आणि तुमचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होते. 
2. धूम्रपान टाळा: धूम्रपान तुमचे अंडाशय आणि शुक्राणू साठी घातक आहे. सिगारेट हे शुक्राणू आणि स्त्री बीज नष्ट करते. अधिक धूम्रपान करणाऱ्या महिलांना रजोनिवृत्ती लवकर येण्याचा धोका असतो, तर धूम्रपान करणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूची गती १३% कमी असते, जे अंडाशया पर्यंत पोहोचू शकत नाही. धूम्रपान टाळल्याने गर्भधारणेसाठी मोठी संधी उपलब्ध होते आणि भविष्यातील गर्भधारणा योजनेसाठी देखील सोईस्कर होते. 
3. अति मद्यपान टाळा: अति मद्यपान केल्याने शुक्राणूची गतिशीलता कमी होऊन गर्भधारणेची क्षमता कमी होते. शिवाय अति मद्यपान करणाऱ्या महिलांच्या गर्भात अल्कोहोल सिंड्रोमची समस्या होऊ शकते, त्यामुळे गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या महिलांनी अल्कोहोल पासून आणि मद्यपान करण्यास प्रेरित करणाऱ्या लोकांपासून दूर रहावे.
4. संक्रमण टाळा: जर तुम्ही गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल तर, एक महत्वपूर्ण गोष्टींपासून सतर्क रहा. ती गोष्ट म्हणजे अति जोखीमयुक्त पदार्थाचे सेवन टाळा. जसे की, अति तळलेले पदार्थ, पाश्चराइज्ड डेअरी फूड, न शिजवलेले मांस, सॉफ्ट चीज, सुशी, हाय मर्क्युरी फिश ई. पदार्थ गर्भाशयातील संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात. ज्यामुळे कमी वजनाचे भ्रूण, अकाली जन्म तसेच प्रेगनेनसी दरम्यान अनेक कॉम्पलीकेशनचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही योग्य शिजवलेले अन्न आणि पाश्चराइज्ड डेअरीयुक्त आहार घेत नाही ना याची काळजी घ्या. 
5. संकोच करणे टाळा: प्रजनन समस्या एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. जसे की छातीत दुखणे किंवा उच्च रक्त दाबाचा त्रास झाल्यास आपण तात्काळ डॉक्टरांकडे जातो, अगदी तसेच प्रजनन समस्यांसाठी फर्टीलिटी तज्ञांकडे जाण्यास संकोच करू नये. आपली प्रजनन तपासणी करा. ज्यामध्ये तुम्ही फॅलोपियन ट्यूब, यूटेरस, स्पर्म हेल्थ आणि जेनेटिक प्रोफाईल ई. ची तपासणी करू शकतात. आय. व्ही. एफ. सारख्या सहाय्यक उपचारांमुळे तुम्हांला गर्भधारणा सध्या करण्यास मदत होऊ शकते. 
6. स्वतःला दोष देणे थांबवा: गर्भधारणा प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी एकमेकांना कारणीभूत असतात, पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये मनुष्य सर्वात अकार्यक्षम सस्तन प्राणी आहे. म्हणूनच मनुष्य जन्माला ‘प्राणी पुनरुत्पादन’ नव्हे तर ‘मानवी पुनरुत्पादन’असे म्हंटले जाते. आपण गर्भवती कसे झालो, याबाबत अनेक बढाया मारताना महिला अवतीभोवती तुम्हाला दिसतील, ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट जारी असली तरी, स्वभाविकत: निरोगी गर्भधारणेसाठी सुमारे 6 ते 12 महीने प्रयत्न करावे लागतात. प्रजनन तज्ञांशी मदत घेतल्यामुळे योग्य निदान आणि माहिती मिळू शकते, ज्याद्वारे योग्य उपचारांसह गर्भधारणेची शक्यता चांगली होते. त्यामुळे स्वतःशी चांगले रहा, स्वतःला दोष देत बसू नका. 
7. तणाव टाळा: तान हा सगळ्यांचा नावडता शब्द आहे. कोणालाच तान नको हवा असतो, पण कोणत्या न कोणत्या कारणाने हा तणाव प्रत्येकांच्या आयुष्यात येऊन, माणसांना प्रगतीपासून मागे ओढत असतो. त्यामुळे या तणावाचा सामना करण्याच्या पद्धतीपासून वाचण्याचा योग्य तो सराव करणे आवश्यक आहे. 
श्वासोच्छवासाचा व्यायाम आणि ध्यान केल्याने तणावाचा सामना करता येतो. आनंदी आणि तणावरहित आयुष्य जगण्याचा उपदेश देणारी अनेक वेबसाईट आणि एप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील तुम्हाला सोईस्कर वाटणाऱ्या मार्गाचा अवलंब करा. 
आपले दू:ख आणि तणाव दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते करा. एखादा थेअरपिस्ट किंवा आपल्या जवळच्या मित्राशी संवाद साधा. तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुधारा, आपला तणाव घालवण्यासाठी आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवा. तुमच्या गरोदरपणात या गोष्टी खूप महत्वपूर्ण काम करतात.
8. डोहाळे जेवण, ओटी भरण सारख्या समारंभात इच्छा नसल्यास जाणे टाळा: गर्भधारणेचा प्रयत्न करत असणाऱ्या बहुतांश महिला गरोदर स्त्रियांचे डोहाळे जेवण आणि ओटी भरण संस्कार पाहून दु:खी आणि निराश होतात, त्यामुळे अश्या समारंभात ते स्वेच्छेने सहभाग घेऊ शकत नाही. जर तुम्हीदेखील यामधील एक असाल, तर अश्या समारंभात जाण्यास स्वतःला भाग पाडू नका. तुमचे मित्र तुमची मानसिकता ओळखतील, आणि सर्व काही सुरळीत होईल. त्यामुळे जेव्हाही असे काही समारंभाचे आमंत्रण येईल, त्यावेळी स्वतःला प्रथम स्थानी ठेवा. तुमची मानसिक तयारी नसेल तर थेट नाही म्हणून टाका. 
 
आपण गर्भधारणा साध्य करण्यासाठी एक चांगल्या स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. ते तुम्हांला योग्य मार्गदर्शन करू शकतील, शिवाय गर्भधारणेसाठी काय करावे आणि काय करू नये याची योग्य माहिती देऊ शकतील. 

- DR HRISHIKESH PAI