रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

वाढत्या वयासोबत घटतो महिलांचा तणाव

महिलांचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे त्यांना जास्त तणावमुकत झाल्यासारखे वाटू लागते. एखादी महिला प्रौढावस्थेत प्रवेश करते, तेव्हा तिला आपला तणाव हलका झाल्यासारखे वाटते आणि जीवनाचा अधिक आनंद घेत ते ती चांगल्याप्रकारे जगते. 
 
एका अध्ययनातून हा खुलासा झाला आहे. याआधीच्या अध्ययनांमध्ये प्रौढावस्थेत महिला जास्त तणाव व नैराश्यात असतात, असे म्हटले होते. त्याला या अध्ययनामुळे छेद मिळाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, तणावाचा संबंध आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रणाच्या क्षमतेशी असतो. असे समजले जाते की, बहुतांश महिलांमध्ये वाढत्या वयासोबत हे गुण कमी होतो. 
 
दुसरीकडे काही प्रौढावस्था महिलांसाठी असंतुष्ट राहण्याचा कालावधी असतो, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. या नव्या अध्ययनातून वयाच्या या टप्प्यावर महिला कमी तणावाचे व आनंदित जीवन जगतात, असे समोर आले आहे. या अध्ययनाचे प्रुखम एलिझाबेथ हेडगेन यांच्या माहितीनुसार, ज्यावेळी महिला प्रौढावस्थेत पोहोचतात, तेव्हा त्यांच्या तणावाची पातळी कमी होते. बहुधा यामुळेच जीवनात तणाव आपोआप कमी होतो किंवा मग वयासोबत त्याची त्यांना सवय होते. दुसरे कारण असेही असू शकते की, जीवनाच्या सुरुवातीस काही गोष्टी जेवढ्या अडसर ठरतात, तेवढ्या नंतर वाटत नाहीत, असे एलिझाबेथ यांनी सांगतिले