गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

युरिक अॅसिड वाढल्यास हे घरगुती उपाय करा!

गुडघे, पायांची बोटे आणि टाचा दुखत असतील तर शरीरात युरिक अॅसिड वाढल्याचे समजावे. घरगुती उपायांनी ही समस्या दूर करता येते जसे... 
 
* सकाळी रिकाम्यापोटी दोन -तीन आक्रोड  खावेत. 
* जेवणानंतर चमचाभर जवस चावून खाता येईल. 
* कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस यांचे मिश्रण पिता येईल. 
* दररोज नारळपाणी प्यायल्याने ही दूर होते. 
* आहारात ओव्याचा समावेश करावा. पाण्यासोबत ओवा खाता येईल.  
* चमचाभर अश्वगंधाची पूड, चमचाभर मध गरम दुधात घालून प्या. उन्हाळ्यात अश्वगंधाचे प्रमाण कमी ठेवावे. 
* युरिक अॅसिडमुळे शरीरात गाठी होतात. हे टाळण्यासाठी पाण्यात चमचाभर बेकिंग सोडा घालून प्या. यामुळे गाठी विरघळतात.