बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

AIDS Day 2023 Slogans and Quotes एड्स घोषवाक्ये

HIV quotes
असेल एड्स जेथे
जीवनाचा नाश तेथे.
 
संयम पाळा, एड्स टाळा
 
असुरक्षीत लैंगिक संबंधात करू नका घाई
हा मानव जन्म पुन्हा नाही.
 
कंडोमचा वापर करून
एड्सला लावा पळवून
 
करा प्रतिज्ञा स्वतःशी
दूर राहील असुरक्षित संबंधाशी
 
सुरक्षेत आहे तुमची भलाई
हीच खरी जीवनाची कमाई
 
सुरक्षित लैंगिक संबंध दूर करी एड्स चे बांध
 
एड्स मुळे होते जीवनाचे खंडण
म्हणूनच वापरा निरोध कंडोम
 
कंडोम वापरून होईल सुरक्षा
हीच जीवनाची खरी परीक्षा
 
मैत्री करावी कंडोम शी
नसेल भीती एड्सशी
 
चाचणी करा रक्ताची
समस्या दूर होईल एड्सची
 
हस्तांदोलन करा न भिता
एड्स होत नाही कोणाला स्पर्शता
 
नियम पाळा, एड्स टाळा.
 
लैंगिक संबंध ठेवता दक्षता पाही
कारण एड्सवर कोणताही इलाज नाही
 
होऊन जरा सुशिक्षित
करा लैंगिक संबध सुरक्षित
 
करा त्या सर्व गोष्टी
ज्यामुळे होईल एड्सची पुष्टी
 
एड्स आजार नाही सोपा
म्हणून त्यापासून स्वतःला जपा
 
एड्स वर गरज नाही औषधाची
फक्त काळजी घ्या स्वतःची
 
गरज हवेची असे पक्षा
करा एड्स पासून स्वतःची सुरक्षा
 
कंडोम मुळे होईल सुरक्षा
बरे आहे ते एड्स पेक्षा
 
होऊन सारे एकसंध
करुया एचआयव्ही चा प्रतिबंध
 
सुरक्षेचा घेऊन पुढाकार
एड्समुक्त भारताचा करुया निर्धार