सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (11:37 IST)

लसीकरणानंतर आठवडाभर कठोर व्यायाम टाळा, हृदयासंबंधी समस्या उद्भवू शकते

सिंगापूर सरकारने आपल्या नागरिकांना कोव्हीड -19 लस मिळाल्यानंतर किमान आठवडाभर कठोर व्यायाम किंवा जड काम टाळण्यासाठी सल्ला जारी केला आहे. लसीकरणानंतर जास्त काम केल्याने काही लाभार्थींमध्ये ह्रदयाचा त्रास उद्भवण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे.
 
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सुधारित कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामध्ये, कोरोना लसीचा डोस घेत असलेल्या सर्व लोकांना, विशेषत: 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांना, किमान आठवडाभर कठोर शारीरिक श्रम करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पूर्वी हा कालावधी 12 ते 24 तासांपर्यंत निश्चित केला गेला होता.
 
मंत्रालयात एक 16 वर्षाच्या मुलाचा अभ्यास देखील करत आहे ज्याला जिममध्ये वजन उंचावल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराचा झटका कोविड -19 या लसीशी संबंधित आहे की नाही याची चाचणी केली जात आहे कारण लसीकरणानंतर अनेक तरुणांना हृदयविकाराचा त्रास जाणवत आहे. यामध्ये गंभीर मायोकार्डिटिसचा समावेश आहे, ज्यामध्ये हृदयाच्या स्नायू संक्रमणामुळे कमकुवत होते.