संबंधित माहिती
- आता कोरोनाचा लांबडा व्हेरिएंट जगभरात विनाश आणू शकतो, मलेशियाने डेल्टापेक्षा धोकादायक सांगितले
- ही लक्षणे दुर्लक्ष करु नका, किडनीसंबंधी त्रास असू शकतो
- मुलांना शिकवा आरोग्याचे नियम
- पटना: लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची प्रकृती खालावली, तेजस्वी भेटायला पोहोचले
- Side Effects of Yoga योगाचे जोखीम आणि तोटे
केळीत असलेले औषधी गुण
भारतात वर्षभर केळं मिळतं. पिकलेल्या केळय़ापेक्षा कच्चं केळं जास्त औषधी असतं. प्राचीन काळापासून आयुर्वेदात पेप्टिक अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या कच्च्या केळय़ाचा वापर होताना दिसतो.
कच्चं केळं खाणं सोपं नसल्यामुळे ते उकडून खाणं योग्य ठरेल. कच्च्या केळय़ात विशिष्ट प्रकारचं डाएटरी फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि स्टार्च असतात. त्यामुळे लाभ होतो.
कच्च्या केळय़ात व्हिटॅमिन बी ६चं प्रमाण जास्त असतं. एक कप उकडलेल्या केळय़ात ३९ टक्के व्हिटॅमिन बी ६ असतं.
कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि अँनिमियाग्रस्त रुग्णांना फायदा होतो.
हे केळं टॉनिकचं काम करतं. स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कच्च्या केळय़ातील ट्रिप्टोफेम नामक तत्त्व तणाव कमी करण्यास मदत करतं.
याचबरोबर अँसिडिटी कमी करण्यासाठीही याची मदत होते. कच्च्या केळय़ाच्या नियमित सेवनाने डायबिटीस तथा अल्सरवर नियंत्रण राहतं. यामध्ये पोटॅशियमची पर्याप्त मात्रा असते. त्याचाही फायदा होतो.
पुढील लेख
