सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (16:02 IST)

मेंदू कमजोर करणार्‍या सवयी

वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होणे ही सामान्य बाब आहे. पण तरुणपणामध्ये अशा त्रासाला सामोरे जावे लागले तर मा‍त्र त्यामागे मोठे कारण असू शकते. अनेकदा रोजच्या आयुष्यात अजाणतेपणी अशा चुका होतात की मेंदू चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे मेंदूचे कार्य योग्य प्रकारे होत नाही आणि विस्मरणाचा आजार होतो. भविष्यात आजार वाढू शकतो. त्यामुळे आजपासूनच आपल्या काही सवयी बदलाव्यात. त्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. कोणत्या सवयींचा वाईट परिणाम होतो पाहुया. 

आहारातील बेफिकीरी : आहारात बेफिकीरी किंवा निष्काळजीपणा केल्यास मेंदू कमजोर होतो. त्यामुळे न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत पोषक आहार घेतला पाहिजे. सकाळी न्याहारी न करता बाहेर पडल्यास मेंदू सक्रिय राहाणार नाही आणि ऑफिसमध्ये कामात लक्ष लागत नाही. त्याशिवाय दुपारी आणि
रात्री दोन्ही वेळच्या जेवणात अतिआहार घेतल्यास मेंदू गडबडतो.
 
धूम्रपान : धूम्रपान आयुष्य कमी करतो तसेच मेंदू कमजोर करतो. मॅकगिल विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासानुसार धूम्रपानामुळे कॉर्टेक्सवर परिणाम होतो. स्मरणशक्ती आणि भाषा कौशल्यासाठी हे धोक्याचे आहे. 
 
चुकीच्या सवयी : हल्लीच्या जीवनशैलीत उशिरा झोपणे, व्यायाम न करणे ह्या सर्व सवयींचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. उशिरापर्यंत मोबाइलवर चँटिंग करत राहिल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूवर होत असतो.
 
कमी पाणी पिणे : पाणी पिणार्‍या लोकांचा मेंदू पाणी न पिणार्‍यांपेक्षा 14 टक्क्यांहून अधिक चांगले काम करतो. असे म्हटले जाते की कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा परीक्षेलाजाण्यापूर्वी पाणी प्यावे त्यामुळे मेंदू काही विसरत नाही.
 
आळस : आळशी लोकांचे मेंदू कमी सर्जनशील आणि कमजोर असतो. कारण त्यांच्या मेंदूला फारसे काम मिळत नाही. त्यामुळे मेंदू जितका कार्यशील राहील तितकाच तो अधिक शार्प आणि क्रिएटीव्ह होईल. त्याशिवाय रोज व्यायाम केल्याने मेंदूला ऊर्जा मिळते आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. 
 
ताण : ताण हा शरीराचा शत्रू आहे त्यामुळे तणाव येणे टाळले पाहिजे. त्याचा सर्वात वाईट परिणाम मेंदूवर होतो. कारण ताणात असल्यास मूत्रपिंड कॉर्टिसॉलची निर्मिती करते. मात्र कॉर्टिसॉलची जास्त प्रमाणातील निर्मिती ही मेंदूच्या पेशींवर वाईट परिणाम करते. 
 
जंक फूड : तरुण पिढीला जंकफूडचे आकर्षण असतेच. घरातील जेवण त्यांना आवडत नाही. पण जंक फूडमध्ये एम एसजी नावाचे मीठ असते. यामुळे मेंदूच्या न्यूरॉन रिसेप्टर्सचे नुकसान होते. जास्त प्रमाणात जंक फूड सेवन केल्यास कन्फ्युजन, डोकेदुखी आणि उलटी होणे यासारख्या समस्या दिसून येतात.
 
इअरफोन : हल्ली मोबाइलवर इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय हल्ली प्रत्येकाला असल्याचे दिसून येते. पण ही गाणी हळू आवाजात ऐकायला हवी. कारण कानखराब होतात पण मेंदूच्या पेशींचे नुकसान होते. सतत हेडफोन्स वापरल्यास अल्झायमरची समस्या निर्माण होते.
 
झोप : व्यक्तीला रोज रात्री कमीत कमीत 7 ते 8 तास झोप आवश्यक असते. त्यामुळे मेंदू योग्य प्रकारे काम करतो आणि व्यक्तीला सकाळी ताजेतवाने वाटते. पण व्यक्तीला पुरेशी झोप मिळाली नाही तर मेंदूचे कार्य बिघडते आणि काळानुरूप मेंदूची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. 

डॉ. अतुल कोकाटे