चालण्याने आयुष्यामध्ये होते सात वर्षांची वाढ!
लंडन- एकाच जागी सतत बसून राहणे हे सर्वच दृष्टीने हानिकारक आहे. आपल्याकडे प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटले आहे की तुम्ही चालू लागला की तुमचे दैवही चालू लागते, धावू लागला की धावू लागते आणि तुम्ही बसला की तुमचे दैवही बसकण मारते! आरोग्याबाबात तर ही गोष्ट अक्षरक्ष: सत्य आहे.
आता ब्रिटिश संशोधकांनी म्हटले आहे की चालण्याने केवळ आरोग्यच सुधारत नाही तर आयुर्मानही वाढते. तुम्ही दरररोज 25 मिनिटे चालतात, तर तुमे आयुष्य सात वर्षांनी वाढते. हृदय रोगाचे सध्या प्रमाण खूपच वाढलेले असून 50 ते 60 वयोमानातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
ब्रिटनमध्ये तर हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रत्येक सात सेकंदात या देशात एकाचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याचे चित्र आहे. या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे चालणे, असे या संशोधकांनी सांगितले. यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी मध्ये या संशोधकांनी आपला संशोधनावर अहवाल सादर केला. या संशोधकांनी 30 ते 60 वयोगटांतील 69 व्यक्तींची तपासणी केली. त्यांना दररोज चालण्याचा व्यायाम करण्यास सांगण्यात आले.