शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

एकाकीपणाची भावना देऊ शकते अकाली मृत्यू

एकाकीपणाची भावना एकटे राहण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. ज्या लोकांना एकाकी वाटते, त्यांच्यामध्ये खराब मानसिक आरोग्य व हृदयविकार बळावण्याची शक्यता जास्त असते आणि एकटे राहणार्‍या लोकांच्या तुलनेत त्यांना मृत्यूही लवकर येतो. एका ताज्या अध्ययनातून हा खुलासा झाला आहे. या अध्ययनाच्या निष्कर्षामध्ये असे दिसून आले की, एकाकीपणा महिला आणि पुरुषांमध्ये मृत्यूच्या दुप्पट जोखमेशी संबंधित आहे. एकाकीपणाची जाणीव होणार्‍या पुरुष आणि महिलांमध्ये एकाकीपणा न वाटणार्‍या लोकांच्या तुलनेत चिंता आणि नैराश्याची लक्षणे तिपटीने जास्त असण्याची शक्यता असते व त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेची पातळी कमी असते. कोपेनहेगन विद्यापीठातील पीएचडीची विद्यार्थिनी विनगार्ड क्रिस्टेनसेन यांनी सांगितले की, एकाकीपणा हृदयाचे आजार असलेले रुग्ण आणि एकटे राहणार्‍या पुरुष आणि महिलांध्ये अकाली मृत्यू, खराब मानसिक आरोग्य आणि की गुणवत्तेच्या जीवनाची भविष्यवाणी करते. या अध्ययनाध्ये 13 हजार 463 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. खराब सामाजिक संबंध या रुग्णांच्या खराब निष्कर्षांशी संबंधित आहे, हे या अध्ययनातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रुग्णांना हृदयविकार, एरिथिमिया व हृदयाच्या झडपेचे आजार होते. त्यांना हृदयाचे आजार असूनही त्यांच्यात एकाकीपणाची भावना त्यांच्या खराब निष्कर्षांशी संबंधित होती.