शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (17:11 IST)

गरम चिकन सूप प्यायल्याने सर्दी बरी होते का? तज्ज्ञ काय म्हणतात?

chicken soup
सर्दी किंवा नाक चोंदल्याचा त्रास होत असताना गरम पेय प्यायल्याने आराम मिळतो, असं म्हटलेलं आपण ऐकत असतो.बर्‍याच देशांमध्ये, औषधाच्या ऐवजी आजारी लोकांना आणि सर्दी झालेल्यांना गरम चिकन सूप दिलं जातं. शेकडो वर्षांपासून आपला हे मान्य करत आलो आहोत की, चिकन सूपमुळे सर्दीपासून आराम मिळतो.
 
काळानुरूप चिकन सूपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वाद जोडले गेलेत. प्रत्येक देशात त्यांच्या आवडीनुसार ते बनवलं जातं.
 
आजार बरा व्हावा म्हणून चिकन सूप प्यायला हवं असा पूर्वीसाराखा कोणताही नियम आता राहिलेला नाही. इ. स. 60 च्या दशकात रोमन सम्राट नीरोच्या अधिपत्याखाली लष्करी शल्यचिकित्सक असलेले पेडॅनियस डायोस्कोराइड्स यांनी जवळपास 100 वर्षे त्यांच्या सर्वसमावेशक वैद्यकीय कार्यपद्धतींचं पालन केलं.
 
पण आपल्याला जितकं वाटतं तितकं चिकन सूप खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का? आजारी असताना सूप प्यायल्याने मानसिक समाधान मिळतं, हे खरं आहे का? आणि खरंच चिकन सूप प्यायल्याने सर्दीपासून आराम मिळतो का?
 
डेटन विद्यापीठातील पोषण आणि आहारशास्त्राचे प्राध्यापक कोल्बी थिमन यांच्याकडे या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत.
 
भूक वाढवण्यासाठी...
कोल्बी थिमन म्हणाले की, त्यांना चिकन सूप खाण्याचे फायदे व्यवस्थित माहित आहेत. उकडलेले चिकन, भाज्या आणि मसाले घालून बनवलेलं गरम सूप आपल्या शरीरासाठी कसं चांगलं असतं, हे कोल्बी यांनी समजावून सांगितलं.
 
ते म्हणाले, "आजारी माणसांसाठी काहीही चांगलं नसतं. पण गोड, खारट, खमंग, कडू आणि मांसाहारी चव असलेलं सूप प्यायल्याने तोंडाला चव येते."
 
प्रथिनांमध्ये अमीनो ॲसिड महत्त्वाचं आहे. मांसाहारी चव असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये ग्लुटामेट अमिनो अॅसिड असतं. पण फक्त मांसाहारी चव मांसातच असते असं नाही. चीज, मशरूम, मिसो, सोया सॉस सारखे घटकदेखील मांसाची चव वाढवतात.
 
अलिकडच्या अभ्यासात असं दिसून आलंय की की चिकन सूपमुळे मिळणा-या आरामासाठी ही मांसाहारी चव जबाबदार आहे.
“मी श्‍वसनाचे आजार असलेल्या लोकांना कमी किंवा अजिबात काहीच अन्न न खाताना पाहिलंय. याला कोणतंही विशिष्ट कारण नाही. जेव्हा आपल्याला दुखापत किंवा एखादा आजार होतो तेव्हा शरीराच्या पांढऱ्या रक्त पेशी कार्यन्वित होतात आणि वेदनेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रभावित भागाकडे धाव घेतात. त्याला आपण 'सूज' म्हणू शकतो. त्यामुळे भूक मंदावते. काहीही खावेसे वाटत नाही," असं ते म्हणाले.
 
एका अभ्यासात असं आढळून आलं की, ज्यांना भूक लागत नव्हती त्यांनी चिकन सूप प्यायल्यावर त्यांना जास्त भूक लागायला लागली, असं संशोधकांनी नमूद केलं.
 
इतर अभ्यासातून असं दिसून आलंय की, या मांसाहारी-स्वादयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. जेव्हा हे पदार्थ खाल्ले जातात तेव्हा मेंदूतील मज्जातंतू सक्रिय होतात आणि चव जिभेपर्यंत पोहोचते आणि लगेचच शरीर अधिक अन्न पचवण्याची तयारी करतं आणि अधिक प्रथिने शोषण्यासाठी अधिक सक्षम बनतं, असंही अभ्यासातून दिसून आलंय.
 
काही लोकांचा असा विश्वास आहे की चिकन सूपचे सेवन केल्याने त्यांना आजारी असताना थोडा आराम मिळालाय.
 
सूज आणि नाक चोंदण्यापासून सुटका
 
जेव्हा श्वसनाचा आजार होतो तेव्हा शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी रक्तात जमा होतात, प्रभावित भागात पोहोचतात आणि त्यांचे कार्य सुरू करतात.
 
आजारी लोकांमध्ये सर्दी, फ्लू, नाक चोंदणे, खोकला, नाक वाहणे, शेंबूड यांसारखी लक्षणं आढळतात.
 
"जर तुम्ही पांढऱ्या रक्तपेशींचा वेग कमी केला तर त्याचा परिणाम कमी होईल. चिकन सूप हेच करतं," कोल्बी म्हणाले.
 
"न्युट्रोफिल्स सारख्या पांढऱ्या रक्त पेशींची प्रक्रिया मंदावल्याने रक्तसंचय होते, चिकन सूप प्यायल्याने हा रक्तसंचय कमी होण्यास मदत होते."
 
गरम पाणी पिण्यापेक्षा चिकन सूप जास्त प्रभावी
संक्रमणाशी लढण्यासाठी लागणा-या आवश्यक प्रथिनांच्या निर्मितीसाठी चिकन सूप तयार केलं पाहिजे. सूप बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या भाज्या शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स देतात.
 
"श्वासातून गरम चिकन सूपचा सुगंध शरीरात गेल्याने नाक आणि श्वसनमार्गाचे तापमानही वाढते. यासोबतच अनेकदा श्वसनाच्या आजारांमुळे होणाऱ्या शेंबडापासूनही मुक्ती मिळते.”
 
"गरम पाणी पिण्यापेक्षा चिकन सूप जास्त प्रभावी आहे," असं कोल्बी म्हणाले.
 
चिकन सूप बनवण्यासाठी वापरली जाणारी मिरपूड आणि लसूण यांसारखे मसाले देखील रक्तसंचय दूर करतात, असं म्हटलं जातं. तर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असलेलं सूप शरीरातील पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राखण्यास मदत करतं.
 
चिकन, भाज्या आणि पुरेसे मसाले घालून घरी तयार केलेलं चिकन सूप खूप फायदेशीर आहे.
 
ते म्हणाले, "चांगला गुण येण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अल्ट्रा-प्रोसेस्ड चिकन सूपपेक्षा घरी बनवलेलं सूप शरीरासाठी केव्हाही चांगलं असतं."
 
"थोडक्यात, ताज्या अभ्यासातून असं दिसून आलंय की चिकन सूप रुग्णाची सर्दी पूर्णपणे कमी करत नसलं तरी रूग्णाला सूप प्यायल्याने आराम जरूर मिळतो.", असं कोल्बी म्हणाले.
 
 






















Published By- Priya Dixit