1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकडा खाल्ल्यास होतात इतके सारे फायदे

sweets
डार्क चॉकलेट मध्ये अँटीऑक्सीडेंट आणि खनिज असते. ज्याचा फक्त एक छोटा तुकडा देखील खाल्यास हृदय रोगापासून रक्षण होते. पण यामध्ये अधिक प्रमाणात साखर आणि कॅलरी देखील असते म्हणून खातांना कमी प्रमाणात खावे. 
 
डार्क चॉकलेट पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. जी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. डार्क चॉकलेट अँटीऑक्सीडेंट आणि मिनरल्सने परिपूर्ण असते. अनेक अध्ययनने माहित झाले आहे की, डार्क चॉकलेटचे सेवन तुम्हाला आरोग्यदायी ठेऊ शकते. तसेच हृदय रोगापासून वाचवते. डार्क चॉकलेट मध्ये 11 ग्रॅम फायबर, 66 प्रतिशत आयरन, 57 प्रतिशत मॅग्नाशीयम, 196 प्रतिशत तांबे आणि 85 प्रतिशत मॅगनीज सारखे अनेक पोषकतत्वे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. डार्क चॉकलेट मध्ये बाकी चॉकलेटपेक्षा कोको पावडर जास्त असते. तसेच ही चॉकलेट इतर चॉकलेटच्या तुलनेत कमी गोड असते. 
 
डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास हृद्य सुरक्षित राहते. तसेच डार्क चॉकलेटमध्ये असलेले बायोएक्टिव यौगिक तुमच्या त्वचेकरिता चांगली असते. तसेच डार्क चॉकलेट मध्ये असलेले फ्लेवनॉल्स हे त्वचेला सूर्यापासून होणाऱ्या किरणांपासून वाचवते. तसेच त्वचेमधील रक्तप्रवाह सुरळीत करते. व त्वचेला टाईट आणि हाइड्रेड ठेवते. 
 
डार्क चॉकलेट तणाव कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट सेवन केल्यास तुमचा मूड चांगला राहतो. चॉकलेट मध्ये असणारे तत्व हे तणाव निर्माण करणाऱ्या कॉर्टिसोल हार्मोनला नियंत्रित करतात. डायबिटीजसाठी देखील डार्क चॉकलेट फायदेशीर असते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik