साधारण सर्दी पडसं आणि कोरोनामधील अंतर कसे तपासणार
कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. विषाणूंच्या या वाढत्या साखळी ला तोडण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची परिस्थिती आली आहे. तथापि, पंतप्रधान यांनी याला शेवटचे पर्याय म्हणून सांगितले आहे.
कोविडची लक्षणे थोड्या-थोड्या दिवसाच्या अंतरावर बदलत आहे. साधारण सर्दी पडसं झाले असेल तरी ही मनात भीती आहे.अशा परिस्थितीत साधारण सर्दी -पडसं झालेला व्यक्ती आणि कोरोना बाधित रुग्णामध्ये अंतर करणे कठीण आहे. चला तर मग या मधील अंतर कसे करावे जाणून घ्या.
* 1 ते 14 दिवसात लक्षणे समजून घ्या -
साधारण सर्दी पडसं, ताप वाढण्यासाठी 1 ते 3 दिवस लागतात. दरम्यान सर्दी-पडसं वाढू लागते तसे लक्षणे देखील दिसून येतात. तर कोविड ची लक्षणे 1 ते 14 दिवसात दिसून येतं आहे. जर आपल्याला सतत खोकला येतं आहे आणि हा खोकला एक तासापेक्षा अधिक काळ पासून येतं आहे तर हे लक्षणे कोरोनाची आहे. क्रोनिकऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी आजार असल्यावर ही स्थिती उद्भवते. या मध्ये जर उशीर केला तर स्थिती गंभीर होऊ शकते. म्हणून ताबडतोब चाचणी करवून घ्या .यद्यपि सध्या लोक जागरूक आहे आणि ते लक्षणे आढळल्यास त्वरितच चाचणी करत आहे.
* वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता -
कफ,सर्दी,पडसं ताप मध्ये अशी शक्यता कमी आहे की आपल्याला चव किंवा वास येतं नाही.बऱ्याचवेळा नाक बंद असल्यावर देखील वास येतं नाही. असं हंगामाच्या बदल मुळे देखील होत.परंतु कोरोनाच्या लक्षणांमध्ये आढळले की वासासह चव देखील येतं नाही. तर आपल्याला त्वरितच चाचणी करून घ्यावयाची आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्ये घशात खवखव,घशात वेदना होणं,श्वास घेण्यास त्रास होणं,अंगदुखणे समाविष्ट आहे.
4 दिवस औषधोपचार करावा-
सर्दी,खोकला,पडसं,ताप, अंग दुखणे हे सर्व साधारण तापाचे लक्षण आहे. या साठी आपण 4 दिवस उपचार घेऊ शकता. तो पर्यंत आपण स्वतःला आयसोलेट करून घ्या. 4 दिवसानंतर आराम नसल्यास चाचणी करवून घ्या. डॉक्टरांच्या म्हण्यानुसार कोरोनाची लक्षणे देखील बदलत आहे. सध्या अतिसार,उल्टी,डोकं दुखणे हे देखील कोरोनाची लक्षणे आहे.
कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये स्वतः उपचार घेण्यापासून वाचा.वेळच्या वेळी डॉक्टरचा परामर्श घेऊन औषधोपचार घ्या.