शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (11:38 IST)

Hydroxychloroquine मुळे हृदयाच्या ठोक्यांवर पडू शकतो प्रभाव

ह्युस्टन- संशोधकांनी ऑप्टिकल मॅपिंग सिस्टमचा वापर हे दर्शविण्यासाठी केले आहे की कश्या प्रकारे मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध हृदयाच्या ठोक्याला नियंत्रित करणाऱ्या विद्युतीय सिग्नलमध्ये गंभीर अडथळा ‍निर्माण करते. कोविड 19 च्या संभाव्य उपचार म्हणून या औषधाचा प्रचार केला गेला. 
 
अमेरिकेतील जॉर्जिया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांसह अन्य संशोधकांनी सांगितले की, याचा अभ्यास दर्शवतो की हे औषध हृदयाच्या ठोक्यांना गंभीर रूपात कसं प्रभावित करतं. हार्ट रिदम जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात हे आढळून आले आहे की हे औषध आश्चर्यजनक रूपाने हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमिततेस कारणीभूत ठरतं. 
 
अभ्यासामध्ये, शास्त्रज्ञांनी दोन प्रकाराच्या प्राणांच्या हृदयावर औषधांच्या प्रभावाचे मूल्यांकन केले त्यावरून त्यांना आढळले की हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करणाऱ्या विद्युतीय तरंगाच्या वेळेत बदल होतो. 
 
पण असे आवश्यक नाही की प्राण्यांवर केले जाणारे अभ्यास मानवासाठी प्रभावी असेल. शास्त्रज्ञांच्या सांगितल्यानुसार त्यांनी तयार केलेले व्हिडियोत स्पष्ट दिसून येते की हे औषध कश्या प्रकारे हृदयातील विद्युत तरंगामध्ये गोंधळ करू शकतं.
 
जॉर्जिया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह लेखक फ्लॅव्हियो फेंटन यांनी सांगितले की त्यांनी या प्रयोगासाठी ऑप्टिकल मॅपिंगचे आधार घेतले. त्यांमुळे त्यांना हे बघता आले की हृदयाच्या तरंग कश्या बदलतात. 
 
इमोरी विश्वविद्यालय रुग्णालयाचे प्राध्यापक आणि सह लेखक शहरयार इरावनीयन म्हणाले की कोविड 19 च्या विषयाला घेऊन या औषधाची चाचणी क्लीनिकली परीक्षण पर्यंतच ठेवावे. 
 
त्यांनी सांगितले की रूमेटाइड आर्थराइटिस आणि ल्युपस सारख्या आजारांमध्ये देखील या औषधांचे वापर केले जाते आणि अशे रुग्ण क्वचितच हृदयाच्या  ठोक्यांचा अनियमिततेला सामोरी जातात. कारण जेवढ्या प्रमाणात हे औषध देण्याची शिफारस कोविड 19 च्या रुग्णांसाठी केली जात आहे त्या पेक्षा या रुग्णाला कमी प्रमाणात औषध दिले जात आहे.
 
शास्त्रज्ञांनुसार कोविड 19 चे रुग्ण वेगळे असतात आणि त्यांना या औषधामुळे हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका जास्त संभवतो. ते म्हणाले की कोविड 19 च्या रुग्णांसाठी त्या औषधांचे प्रमाण सामान्यांपेक्षा दोन ते तीन पट जास्त आहे. कोविड 19 आजार हा हृदयावर प्रभाव टाकतो आणि पोटॅशियमचं स्तर कमी करतो. जेणे करून हृदयाचे ठोक्यांमध्ये अनियमितता होण्याचा धोका संभवतो.