1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

कापलेले टरबूज ठेवत असाल फ्रिजमध्ये, तर तयार होते विष

उन्हाळ्याचे दिवस आलेत की सर्वांना टरबूज खायला आवडते. टरबूज हे पाणीदार, गोड आणि ताजे असते. जे आपल्याला उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम देते, शरीराला थंड ठेवते. अनेक लोक कापलेले टरबूज फ्रिजमध्ये ठेवतात त्यामुळे नुकसान होऊ शकते. टरबूज विटामिन C, A, B6 आणि पोटेशियम सारखे अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. जेव्हा तुम्ही टरबूजला कापून फ्रिजमध्ये ठेवतात तेव्हा त्यामधील पोषकतत्व नष्ट होतात. 
 
या पोषक तत्वांची होते कमी 
व्हिटॅमिन C- व्हिटॅमिन C हे एक अँटीऑक्सीडेंट आहे. जे रोगप्रतिकात्मक शक्तीला वाढवते. टरबूज हे उष्णता आणि प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. जेव्हा कापलेल टरबूज फ्रिजमध्ये ठेवले जाते तेव्हा त्यातील व्हिटॅमिनचे प्रमाण कमी होते. 
 
व्हिटॅमिन A- व्हिटॅमिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकात्मक शक्तीसाठी महत्वपूर्ण आहे. कापलेले टरबूज फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील व्हिटॅमिनचे प्रमाण कमी होते. 
 
व्हिटॅमिन B6- व्हिटॅमिन B6 हे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेड चयापचय मध्ये मदत करते. हे उष्णता आणि प्रकाशासाठी संवेदनशील आहे. 
 
पोटॅशियम- पोटॅशियम रक्तचापला नियंत्रित करायला मदत करते आणि हृदयाला आरोग्यदायी ठेवायला मदत करते. हे देखील उष्णता आणि प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. 
 
चवीमध्ये बदल- 
टरबुजाची गोड आणि रसदार चव त्याच्या नैसर्गिक साखर आणि पाण्याच्या प्रमाणामुळे असते. जेव्हा कापलेले टरबूज फ्रिजमध्ये ठेवले जाते. साखरेचे प्रमाण कमी होऊन जाते आणि पाण्याची वाफ होऊन जाते यामुळे टरबुजाची चव बदलते. ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले टरबूज कोरडे आणि कमी रसदार बनते. 
 
बॅक्टिरियल संक्रमणाचा धोका 
टरबूज हे पौष्टिक फळ आहे. जेव्हा कापलेले टरबूज फ्रिजमध्ये ठेवले जाते, त्यामध्ये बॅक्टीरिया जलद गतीने वाढतो. ज्यामुळे आजाराचे प्रमाण वाढते. 
 
1. साल्मोनेला- साल्मोनेला हा एक बॅक्टीरिया आहे, जो बद्धकोष्ठता, उल्टी, पोटाचे दुखणे याचे कारण बनू शकते. हे टरबूजच्या सालीवर असते आणि कापल्यावर हे फळाला दूषित करू शकते. 
 
2. ई कोलाई- ई कोलाई एक बॅक्टीरिया आहे जो बद्धकोष्ठता, उचकी, ताप येणे याचे कारण बानू शकते. हे देखील टरबूजच्या सालीवर असते. 
 
3. लिस्टेरिया- लिस्टेरिया एक बॅक्टेरिया आहे जो गर्भवती महिला, नवजात शिशू आणि रोगप्रतिकात्मक शक्ती कमी असलेल्या लोकांसाठी धोकादायक असतो. हा बॅक्टीरिया देखील टरबूजच्या सालीवर असतो. 
 
टरबूजला सुरक्षित कसे ठेवावे- 
एक पूर्ण टरबूजला खोलीमध्ये तापमानावर हवा येईल अश्या जागी ठेऊन एक आठवड्यापर्यंत स्टोर केले जाऊ शकते. 
 
कापलेले टरबूज हे एक एयरटाइट कंटेनर मध्ये ठेऊन फ्रिजमध्ये 3-4 दिवसांपर्यंत स्टोर केले जाऊ शकते. 
 
टरबूज कापण्यापूर्वी आधी स्वच्छ धुवून घ्यावे यामुळे त्यावरील बॅक्टीरिया निघून जाईल. 
 
टरबूज कापण्यासाठी नेहमी स्वच्छ सुरीचा उपयोग करावा. तसेच कापलेले टरबूज लवकर खावे, यामुळे बॅक्टीरिया वाढणार नाही. 
 
सामान्यतः टरबूज हे पौष्टिक आणि ताजे फळ आहे. पण कापलेले टरबूज फ्रिजममध्ये ठेवल्याने त्यामधील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते. तसेच चव बदलते. बॅक्टीरियाचा धोका वाढतो, याकरिता टरबूज लवकर खाणे आरोग्यासाठी चांगले असते किंवा चांगल्या प्रकारे स्टोर केल्यास ते सुरक्षित राहते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik