शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (19:19 IST)

कोविड पोस्ट थकवा दूर करण्यासाठी काय करावे तज्ञांचा सल्ला जाणून घ्या

लखनऊ, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. प्रिया वशिष्ठ यांनी कोविड 19 नंतरच्या रुग्णांच्या आहार व्यवस्थापना विषयी खास संभाषणात सांगितले की, आपला देश कोविड 19 साथीच्या रोगाशी लढत आहे. तथापि, या दरम्यान, मोठ्या संख्येने लोक  या संसर्गापासून बरे देखील होत आहेत. कोविड पासून बरे झाल्यानंतर थकवा ही एक सामान्य समस्या समोर येत आहे आहे.
अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारातील काही पदार्थांचा समावेश करून आपली ऊर्जा परत मिळवू शकता पोस्ट कोविड रूग्णांनी त्यांच्या आहारात बीन,टोफू,पनीर,अंडी, दही,डाळी,शेंगदाणे,सीट्स स्प्राउटेड,सारखे पदार्थ घेतल्याने आपल्याला त्वरित ऊर्जा मिळेल.यापैकी बहुतेकांमध्ये मॅग्नेशियम समृद्ध आहे, जे उर्जेची पातळी पुनर्संचयित करण्यात मदत करते.
प्रोटीनयुक्त आहार स्नायूंना कमी होण्यापासून वाचवत.तसेच श्वसनाच्या स्नायूंना देखील बळकट करेल.डॉ वशिष्ठांनी सांगितले की याव्यतिरिक्त,त्यातअसणारे आवश्यक अमीनो ऍसिड हानिकारक सूक्ष्मजंतूंपासून आपले संरक्षण करतात.या बरोबरच माइक्रोन्यूट्रिएंट्स देखील आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहे.हे रंग-बेरंगी भाज्या, फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळत.जसे की सफरचंद, खजूर पपई, केळी, किवी, दुधी, पालेभाज्या इत्यादी.याच बरोबर अशे 5 आहार आहेत ज्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासह कोविडच्या थकव्यापासून बरे होण्यात मदत मिळते.चला जाणून घ्या.
 
* भिजवलेले बदाम आणि मनुके-
डॉक्टर प्रिया वशिष्ठ यांनी सांगितले की कोविड -19 चा थकवा टाळण्यासाठी भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊन दिवसाची सुरूवात करा. बदामांमध्ये प्रथिने समृध्द असतात आणि मनुका शरीराला चांगले आयरन देते. म्हणून भिजलेले बदाम आणि मनुकाचे नियमितपणे सेवन केल्यास फायदा होतो.
 
* नाचणी डोसा आणि दलिया-
त्या म्हणाल्या की थकवा दूर करण्यासाठी नाचणीडोसा किंवा एक वाटी दलिया खाणे हा उत्तम पर्याय आहे.सकाळसाठी हा एक चांगला आहार आहे. यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि थकवा जाणवत नाही.
 
* गूळ आणि तूप -दुपारच्या जेवणानंतर किंवा जेवण्यात गूळ आणि तुपाचे सेवन करणे फायदेशीर आहे.पोषक घटकांनी समृद्ध हे मिश्रण पोळी सह देखील खाऊ शकता.हे जलद रिकव्हरी होण्यात मदत करतात.गूळ आणि तूप दोन्ही शरीराला उष्ण आणि मजबूत ठेवण्यात मदत करतात.
 
* रात्री खिचडी खा-  
त्या म्हणाल्या की कोरोनाहून बरे झाल्यावर रात्रीचे जेवण जड नसावे.रात्री हलकं आणि सुपाच्य जेवण घ्यावे.रात्री खिचडी खाणे चांगले पर्याय आहे.खिचडीमध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात.हे पोटासाठी देखील सौम्य आहे.याचे बरेच फायदे आहे.हे खाल्ल्याने झोप चांगली येते.यामध्ये आपण भाज्या घालून याची चव वाढवू शकतो.
 
डॉ. वशिष्ठ यांनी आवर्जून सांगितले आहे की शरीराला हायड्रेट होणे खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी पिण्या व्यतिरिक्त नियमितपणे घरगुती लिंबाचा रस आणि ताक घ्या. यामुळे रीफ्रेश वाटेल आणि शरीरात साठलेले विष बाहेर येईल.