शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (23:01 IST)

2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क लावू नका

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. परंतु धोका पूर्णपणे टाळता येत नाही. ज्यासाठी अद्याप खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रौढ आणि वृद्ध लोक लस घेत आहेत ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकतो. पण मुलांनाही लस द्यावी का? अशी चर्चा सध्या सुरू आहे तर 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क लावायचे का हा मोठा प्रश्न आहे. चला याविषयी शास्त्रज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेऊया?
 
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, कोरोना प्रौढ माणसांप्रमाणे मुलांना देखील  होऊ शकत. संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखणे  हा एक चांगला मार्ग आहे. जर मुलांना बाहेर नेत असाल  तर त्यांना मास्क लावून नेऊ शकता.परंतु 2 वर्षाखालील मुलांना मास्क लावल्याने त्यांना गुदमरल्यासारखे होऊ शकते.
 
आणखी एक तज्ञ म्हणतात की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांना मास्क लावणे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. कारण मुलांचे श्वसननळीचा मार्ग अरुंदअसतो, यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.आणि मास्क लावल्याने त्यांना श्वास घेण्यास जोर लावावे लागणार. म्हणूनच, मुलांना घरी ठेवणेच चांगले.
 
किड्स हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मास्क न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर लहान मुले मास्क घालतील तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होईल. तो वारंवार चेहऱ्यावरील मास्क काढण्याचा प्रयत्न करतील. आपल्या तोंडाला,नाकाला वारंवार स्पर्श करतील.ते त्यांच्या साठीं धोकादायक असू शकत.या ऐवजी मुलांना घरी ठेवणे चांगले. त्यामुळे जोखीम कमी होईल.
बाल आरोग्य संघटनेने एक सल्लागार जारी केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2 वर्षांखालील मुलांनी मास्क घालू नये. तज्ञांच्या मते, मुलांच्या श्वसनाचे वायुमार्ग खूपच लहान असतात, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येते.