गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (08:15 IST)

किडनी खराब होण्याची 7 लक्षणे जाणून घ्या

Learn the 7 symptoms of kidney damage health article in marathi
किडनीचा आजार वेळीच ओळखला नाही तर हा जीवघेणा होऊ  शकतो .किडनी आपल्या शरीराचा तो भाग आहे जे शरीरातील घाण काढण्यासाठी काम करते. आपल्या दोन्ही किडनी मध्ये नेफ्रॉन्स नावाचे लाखो फिल्टर असतात. हे आपले रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. 
किडनीमध्ये  कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, विषारी पदार्थ  शरीरातून बाहेर निघत नाही या मुळे  बरेच रोग उद्भवू शकतात. हे आजार टाळण्यासाठी, अशी 7 लक्षणे जाणून घ्या ज्या किडन्या  निकामी होण्याचे संकेत देतात. -
 
1 युरिनरी फंक्शन मध्ये बदल होणे -सर्वात पहिले बदल म्हणजे युरिनरी फंक्शन मध्ये बदल होणे आहे. किडनी मध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास लघवीचा रंग,प्रमाण आणि कितीवेळा लघवी  होते या मध्ये बदल होतात. 
 
2 शरीरात सूज येते - किडनीच्या कार्यप्रणालीत  कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा शरीरातून बाहेर न निघणारी घाण आणि द्रव समस्या निर्माण करतात. ज्यामुळे शरीरावर  सूज येते. ही सूज हात, पाय, सांधे, चेहरा आणि डोळ्याखाली येऊ  शकते. आपण आपल्या बोटाने आपली त्वचा दाबल्यास आणि डिम्पल थोडा वेळ बनत असल्यास, डॉक्टरकडे जाण्यास उशीर करू नका.
 
3 चक्कर येणे आणि अशक्तपणा: जेव्हा किडनीच्या कार्य करण्यात  
 अडथळा येतो .तेव्हा आपल्याला चक्कर येण्याची शक्यता जास्त असते. संपूर्ण वेळ आपण थकल्यासारखे आणि अशक्तपणा जाणवतो. ही लक्षणे रक्ताची कमतरतेमुळे आणि शरीरात घाण साचल्यामुळे उद्भवू शकते.
 
4 पाठ दुखीचे कारण न समजू शकणे- आपल्या पाठीत आणि पोटात वेदना होणे किडनी मध्ये  संसर्ग होणे किंवा किडनीशी निगडित इतर आजारांचे लक्षणे होऊ शकतात. 
 
5 त्वचा रुक्ष होणे आणि त्यात खाज येणे- त्वचेवर पुरळ उठणे, विचित्र वाटणे आणि जास्त प्रमाणात खाज सुटणे हे  शरीरात घाण जमा झाल्यामुळे होऊ  शकते. मूत्रपिंडाच्या निकामी झाल्यामुळे  शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण प्रभावित होते, या मुळे अचानक खाज येते. सामान्यत: निरोगी त्वचा देखील फाटते, रुक्ष होऊन खाज सुटते.
 
6 उलट्या होणे : मूत्रपिंडाच्या समस्येमुळे उलट्या होणे ही लक्षणे सामान्य आहेत. याशिवाय गॅसशी निगडित समस्या दररोज सकाळी सामोरी येतात. उलट्या थांबण्यासाठी औषधे घेतल्यानंतरही जर समस्या तशीच असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घ्या.
 
7 थंडी वाजणे- चांगल्या हवामाना शिवाय देखील थंडी वाटत असेल आणि थंडीसह ताप येणं देखील याची लक्षणे आहे. तापमान जास्त उष्ण असले आणि तरीही थंडी वाजत आहे तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.