बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (20:38 IST)

या कारणांमुळे होतो किडनीचा कर्क रोग कारणे जाणून घ्या

1 आनुवंशिक कारण - काही लोकांमुळे खराब जीन्समुळे मूत्रपिंडाचा किंवा किडनीच्या कर्करोगाचा धोका वाढतो.डीएनए मध्ये कोणत्याही प्रकाराचा बदल झाल्यामुळे जीन्स असामान्यरित्या कार्य करतात. या कारणामुळे उद्भवणाऱ्या कर्करोगाला आनुवंशिक म्हटले जाते. ज्या लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे किडनीचा कर्करोग होतो. त्यांच्या मध्ये दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसतात. त्यांच्या प्रत्येक किडनीमध्ये अनेक ट्यूमर किंवा गाठी असू शकतात. आनुवंशिक कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये कमी वयातच या रोगाचे लक्षणे दिसून येतात. 
 
2 किडनी रोग-ज्या लोकांच्या किडनी निकामी होतात त्यांना आठवड्यातून दोन वेळा रक्ताला मशीनद्वारे फिल्टर करावे लागते. या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात. ज्या लोकांना दीर्घकाळापर्यंत डायलिसिस करावे लागते त्यांच्या मध्ये किडनी सिस्ट आणि कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. डायलिसिस चा थेट संबंध किडनीच्या कर्करोगाच्या लक्षणाशी नसतो. 
 
3 धूम्रपान- जर आपण धूम्रपान करता तर या मुळे किडनीचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये सरासरी 50 टक्के कर्करोग होण्याचा धोका वाढतो. परंतु धूम्रपान करण्याची सवय वाढल्यावर ही टक्केवारी वाढू देखील शकते. 
 
4 लठ्ठपणा- तज्ज्ञ म्हणतात की लठ्ठपणा हे मूत्रपिंडाचा किंवा किडनीचा कर्करोग वाढत्या प्रकरणा मागील एक कारण आहे. लठ्ठपणामुळे किडनीच्या कर्करोगाचा धोका जवळजवळ 70 टक्क्याने वाढतो. फारच कमी लोकांना हे माहीत असते की जास्त वजन वाढल्यामुळे देखील कर्करोगाचा धोका वाढतो. 
 
5 उच्च रक्तदाब- 
उच्च रक्तदाबामुळे देखील किडनीचा त्रास उद्भवू शकतो. कारण किडनी शरीरातील दूषित पदार्थ बाहेर काढते. उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या रक्तवाहिनी अरुंद किंवा जाड होतात. या कारणामुळे किडनी व्यवस्थितरीत्या काम करत नाही आणि रक्तात दूषित पदार्थ जमा होऊ लागतात आणि किडनीमध्ये कर्करोगाचे लक्षणे दिसू लागतात. 
   
6 अल्कोहोलचे अधिक सेवन- ज्या लोकांना मद्यपान करण्याची सवय असते आणि जे अधिक प्रमाणात अल्कोहोल घेतात त्यांना किडनीचा कर्करोग होऊ शकतो. अल्कोहोल घेण्याच्या सवयीमुळे त्यांच्या किडनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागतात या मुळे किडनीच्या कर्करोगाचे लक्षणे दिसू लागतात. अल्कोहोल न पिणाऱ्या लोकांमध्ये मद्यपान करणाऱ्या लोकांपेक्षा किडनीचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.