testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

घरी देखील ऑफिसमधील ताण येतो का?

Last Modified बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (00:34 IST)
आजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना अगदी दमछाक होते. ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच
आपल्यावर परिणाम होत असतो. तर कौटुंबिक ताण, वाद याचा परिणाम कामावर झालेला दिसून येतो.

पण हे दोन्हीही ताण एकमेकांपासून वेगवेगळे कसे ठेवावे, हे माहीत असायला हवे. पण अनेकांना ते जमत नाही. मग ऑफिसमधून घरी गेल्यावरही ऑफिसमधील टेंशन्स डोक्याभोवती फे धरू लागतात. दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये काय होईल याची चिंता सतावू लागते. पण या काही टिप्सने तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधील ताळमेळ योग्य प्रकारे साधू शकता.
* सर्वात आधी एक मर्यादा आखून घ्या. स्पर्धा सोपी नसली तरी ऑफिसचे काम घरी नेऊन करु नका. यामुळे तुमचा वर्क लाइफ बॅलन्स बिघडेल. तसेच ऑफिसचे काम घरी आणल्याने त्यासोबत टेन्शनही येणारच. परिणामी पर्सनल लाइफवर त्याचा परिणाम होणार. म्हणून शक्यतो ऑफिस काम ऑफिसमध्ये संपवा.

* ऑफिसमधून निघाल्यावर आपल्याला काय काय काम करायचे आहे, याचा विचार करा आणि त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशीची योजना आखा. त्यामुळे घरी जाऊन कामाचा ताण जाणवणार नाही.

* वेळेचे नियोजन नीट करा. तुमच्या क्षमतेनुसार ठरवलेल्या वेळेत काम पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला ताण येणार नाही. अनेकदा काम वेळेत पूर्ण न झाल्याने ताण येतो. तर काम टाळण्याच्या सवयीमुळे काम अधिक वाढते. त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे.

* ऑफिसमध्ये असताना सोशल मीडियापासून दूर राहा. कारण यात किती वेळ जातो, याचा अंदाज लागत नाही. त्याचबरोबर त्याचा परिणाम कामावरही होतो, हे लक्षात येत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना सोशल मीडियाचा वापरटाळा.

* मॅनेजर किंवा बॉसने एक्सट्रा काम दिल्यास ते करणे शक्य नसल्यास स्पष्ट नकार द्या. कारण यामुळे कदाचित तुमच्या करिअरवर चांगला परिणाम होईल, पण त्यामुळे तुम्ही कामात अधिक गुंग होता. टेन्शन वाढते आणि पर्सनल लाइफवर त्याचा परिणाम होतो.
- जयश्री काळे


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

'नव्वदीच्या डेनिम फॅशन'चे पुनरागमन..!

'नव्वदीच्या डेनिम फॅशन'चे पुनरागमन..!
असं म्हणतात कि इतिहासाची पुनरावृत्ती होते, आणि हे फॅशनच्या बाबतीतही लागू होते. ९० च्या ...

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध
वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं गोड पदार्थ खाणे टाळतात परंतू अलीकडे झालेल्या एका अध्यननात ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...