1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

डायबिटीजसाठी फायदेशीर आहे परवल, जाणून घ्या 5 फायदे

Parvl
आजकाल बाजारात हिरवी हिरवी परवलची भाजी तुम्हाला मिळून लगेच जाईल. अनेक लोक ही भाजी सुखी किंवा रसदार खाणे पसंद करतात. पण तुम्हाला माहित आहे का तोंडलीमध्ये भरपूर व्हिटॅमिन ए, बी1, बी2 आणि सी चे प्रमाण असते. परवलची भाजी डायबिटीज लोकांसाठी गुणकारी मनाली जाते. परवलचे सेवन केल्याने रक्तचाप कमी करण्यासाठी मदत मिळते. 
 
1. रक्तचाप नियंत्रित ठेवते
परवलच्या भाजी मध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. परवल ही रक्तचाप नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच परवल इंसूलिन सेंसिटिविटीला देखील चांगले ठेवते. जे डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर असते. 
 
2. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 
परवल मध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन नियंत्रणात असले की, रक्तचाप देखील नियंत्रणात राहतो. जे डायबिटीज मॅनेज करतो. 
 
3. अँटीऑक्सीडेंट गुण 
परवल मध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट गुण हे शरीराला फ्री रेसिकल्स पासून वाचवतात. यामुळे सेल्सला नुकसान होण्यापासून वाचवले जाऊ शकते. तसेच शारीच्या रोगप्रतिकात्मक शक्तीला देखील मजबूत केले जाऊ शकते. 
 
4. पाचनतंत्रात सुधार 
परवलमध्ये असलेले फायबर हे पाचन तंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करते. व बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करते. एक आरोग्यदायी पाचनसंस्थेसाठी आणि डायबिटीज रुग्णांनसाठी परवल महत्वपूर्ण आहे. 
 
5. आरोग्यदायी हृदय 
परवलमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. जे रक्तचापला नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आरोग्यदायी रक्तचाप हृदयापासून आजार दूर ठेवते. 
 
परवल वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली जाते. जसे की, सूप, सलाड, भाजी. परवलला नियमित डाएटमध्ये देखील सहभागी करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik