शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

पायांना सूज येत असल्यास, अवलंबवा हे घरगुती ऊपाय

Payala suj
खूप वेळेस शरीरात पोषणाची कमी असल्यास चालतांना पायांना त्रास होतो. तसेच खूप वेळ तुम्ही एकाच जागी उभे असाल किंवा बसले असाल, पायात लचक भरली असले, जास्त वजन उचलले असले इत्यादी कारणांमुळे पायांना सूज येते. 
 
याशिवाय पायांना आलेली सूज किडनी, हृदय आणि लिव्हरशी जोडलेली गंभीर समस्या यांचे संकेत देते. अशावेळेस काही घरगुती उपाय पायांना आलेली सूज कमी करण्यास मदत करतात. 
 
पायांना सूज का येते? 
अनेक लोकांना पाय आणि हात सोबत शरीरातील इतर अवयवांना देखील सूज येते. ज्यामुळे तुमची समस्या वाढून शकते. ही एक सामान्य समस्या आहे. जी कोणालाही होऊ शकते.  याचे अनेक कारणे आहे. जसेकी जखम, संक्रमण, गाठ इत्यादी. 
 
घरगुती उपाय 
मिठाचे पाणी-
एका टाबामध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ टाकावे व रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ पाय यामध्ये ठेऊन बसावे. यामुळे सूज कमी होईल. 
 
हळद आणि दूध- 
गरम दुधात हळद टाकून प्यावी. हळदीमध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुण सूज कमी करण्यास मदत करतात. 
 
आळशीचे पाणी- 
आळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्या. हे पाणी सकाळी गाळून प्यावे. यामुळे सूज कमी होते. 
 
लसूण- 
लसूणमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. जे सूज कमी करण्यासाठी मदत करतात. लसूण बारीक करून पेस्ट बनवा व सूज आलेल्या जागी लावा. 
 
मेथीचे दाणे- 
मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवावे. व सकाळी रिकाम्यापोटी खावे. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik