शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

सिगरेट सोडून तर पहा!

बिडी, सिगारेट सोडण्याच्या निश्चयाचे पालन केल्यानंतर 20 मिनिटातच तुमच्या शरीरात बदल होण्यास सुरवात होते. विश्वास बसत नसल्यास फक्त 7 दिवस सिगरेट सोडून पहा. मग आपल्या शरीरात होणार्‍या बदलाचे निरीक्षण करा.

सिगरेट/ विडी सोडल्यावर वीस मिनिटानंतर वाढलेले हृदयाचे ठोके कमी होतात.

तीन तासानंतर वाढलेला रक्तदाब कमी होतो.

बारा तासानंतर रक्तातला कार्बन डाय ऑक्साईड सामान्य पातळीवर येतो.

चोवीस तासानंतर रक्तातल्या इतर विषारी वायूंपासून सुटका होते.

सात दिवसानंतर फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.

चौदा दिवसानंतर ह्रदयविकाराचा धोका कमी होऊन श्वासनलिकेतील पेशींतील म्युकस शुद्धीकरण होते.

एक महिन्यानंतर फुफ्फुसाच्या हवा भरून घेण्याच्या क्रियेत वाढ (श्वसनसंस्था सुधारते) होते. श्वास घेताना होणारा त्रास कमी होतो. खोकला कमी होतो.

तीन महिन्यानंतर फुफ्फुसाच्या पेशींचे कर्करोगाच्या पेशींत रूपांतर होण्याचा धोका 30% कमी होतो.

इतर धुम्रपान करणार्‍यांच्या तुलनेत ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. रोगप्रतिकारक पूर्वीच्या तुलनेत शक्ती 50 % वाढते.

पाच वर्षांनंतर दैनंदिन धुम्रपान करणार्‍यांच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती 70 % वाढते.

दहा वर्षांनंतर कर्करोगाची शक्यता इतर धुम्रपान करणार्‍याच्या तुलनेत 50 % ने कमी होते.

पंधरा वर्षांनंतर पूर्णपणे निरोगी झाल्याचा अनुभव येतो.