गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (08:23 IST)

दुपारची झोप लहान मुलांसाठी हानिकारक

लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी त्यांना दिवसातून पुरेसी झोप ळिणे अतिशय आवश्यक असते. हे खरे असले तरी लहान मुलांसाठी दुपारची झोप वा डुलकी त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेला प्रभावित करू शकते, असा खुलासा एका अध्ययनातून झाला आहे. यासंशोधनानुसार, दुपारची झोप वा डुलकी लहान बाळांच्या रात्रीच्या झोपेच्या वेळेची वाटोळे करते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीचे शास्त्रज्ञ केरेन थॉर्पे यांच्या नेतृत्वाखाली चूने हे अध्ययन केले. त्यात त्यांनी लहान मुलांमध्ये दुपारच्या झोपेचा त्यांच्या 
रात्रीच्या झोपेची गुणवत्ता, त्यांचे वर्तन, आज्ञाधारकपणा आणि शारीरिक आरोग्यावर काय प्रभाव पडतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांध्ये दुपारच्या झोपेचा त्यांच्या रात्रीच्या झोपेवर वाईट परिणाम होत असतो. अर्काइव्ज ऑफ जिसीज इन चाइल्डहुड या ऑनलाइन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनाच्या निष्कर्षानुसार, झोप आणि वर्तन तसचे शारीरिक विकास व संपूर्ण आरोग्यावर पडणारा हानिकारक प्रभाव यांच्यात परस्पर संबंध आहे.