शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (06:07 IST)

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनातून हा खुलासा झाला असून त्यांनी सांगितले की, पनीर जीवनसत्त्व, खनिजे व प्रोटीनने युक्त असते. हृदयाला सुरक्षित ठेवण्यात ते मदत करतात. पनीर चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी घटविते. 
 
पनीरमध्ये एक सिडही असते, ते धन्यांमध्ये येणार्‍या कोणत्याही प्रकारचा अडथळा दूर करते. हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की, पनीरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक व धोका कमी  करण्याची क्षमता असते. पोट व स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारात पनीर अतिशय प्रभावी सिद्ध झाले आहे. दुधापासून बनले जात असल्याने त्यात दुधाचेही गुण असतात. त्यात ऊर्जाच्या स्रोताचाही समावेश आहे. तत्काळ ऊर्जेसाठी पनीरचे सेवन लाभदायक आहे.