शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (16:03 IST)

अबब! स्मार्टफोनच्या चालवणार्‍यांच्या डोक्यावर येत आहे शिंग

अलीकडे मोबाईल फोन आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला आहे. फोनवर बोलत असल्यापासून ते शॉपिंग करणे, इंटरनेटवर चॅटिंग करणे, पैसे ट्रांसफर करणे अगदी लहान-सहान प्रत्येक कामासाठी आपण स्मार्टफोनवर अवलंबून असतो. पण हे जाणून आपणं नक्कीच हैराण व्हाल की जे तरूण अधिक मोबाइल वापरत आहेत त्यांच्या डोक्यावर शिंग निघत आहे. हे आम्ही नाही तर अलीकडील झालेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
 
ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट विश्वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोबाइल आणि टॅबलेट्सच्या अतिवापरामुळे आपल्या शरीराची संरचना बदलत असल्याची बाब समोर आली. हे परिणाम हैराण करणारे ठरले. या संशोधनात तज्ज्ञांनी 18 ते 86 वर्ष वय असणाऱ्या लोकांचा समावेश केला होता. या वयोगटातील तरुणांना मानेची समस्या असल्याचे आढळले. तसेच, लहान मुले आणि तरूणांमध्ये पाठीचा कोण बदलत असल्याचे देखील जाणवले.
 
या संशोधनाप्रमाणे शरीराचं वजन स्था‍नांतरित होऊन डोक्यामागील स्नायूंपर्यंत जातं. यात कनेक्टिंग टेंडन आणि लिगामेंट्समध्ये हाड विकसित होतं. त्याच्या परिणामी तरूणांमध्ये शिंगासारखे हाडं वाढत आहे. टोकदार हाड मानेमध्ये विकसित होण्याचे प्रकार मागील एका दशकात पाहायला मिळत आहेत. 
 
रिसर्चनुसार मोबाइल चालवताना लोक आपल्याला डोक्याला मागे पुढे असे हलवतात. यामुळे मानेच्या खालच्या भागात स्नायूंमध्ये ताण येतो आणि काही दिवसानंतर हाड बाहेरच्या बाजूला निघू लागतं. मुलांच्या पाठीच्या कण्याचा आकार वर्तमान काळात बदलत आहे. त्यासोबतच मोबाइलचा अतिवापर केल्यामुळे त्यांना बॅकपेन, डोकेदुखी, मानेसहित खांद्यामध्ये त्रास होणे यासारख्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
 
याला टेक्स्ट नेट असे नाव देण्यात आले आहे. ज्यात गॅझेट्सवर अधिक वेळ घालवल्यामुळे डोक्याच्या मागच्या बाजूला एक अतिरिक्त हाड वाढत असल्याचं जाणवतं. साधरण 2.6 सेमी. पर्यंत याचा आकार आढळला आहे. मोबाइल-टॅबलेटचा अधिक वापर करणाऱ्या एक हजार लोकांचे डोके स्कॅन केल्यानंतर याची खात्री करण्यात आली आहे.
 
संशोधनाप्रमाणे 41 टक्के तरूणांच्या मागील हाडात वाढ पाहिली जाऊ शकते. महिलांपेक्षा पुरूष यामुळे अधिक प्रभावित आहेत.