गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

शिळा भात आरोग्यासाठी उत्तम

एका संशोधनाप्रमाणे रात्र भरा शिळा भात पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी खाणे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आहे. 
 
शिळा भात खाल्ल्याने फॅट्स वाढतील म्हणून अनेक लोकं दुसर्‍या दिवशी भात खाणे टाळतात. परंतू आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. आसामच्या एर्ग्रीकल्चर युनिव्हर्सिटीद्वारे केलेल्या एका संशोधनाप्रमाणे फर्मेंट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम आहे.
कसे करायचे फर्मेंट
रात्री उरलेला भात एका मातीच्या भांड्यात पाणी टाकून ठेवावा. याने भात फर्मेंट होईल. सकाळी या भाताला फोडणी टाकून किंवा दह्यासोबत ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता.
 
शिळा भात फर्मेंट केल्यास त्यातील आयरन सुमारे 70 टक्क्याने वाढतं. या प्रकारेच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाणही वाढतं. 
 
उष्णता अधिक असलेल्या राज्यांमध्ये असा भात खाण्याची पद्धत असते कारण शिळ्या भाताची तासीर गार असते. याने शरीराचे तापमान संतुलित राहतं. भातात भरपूर मात्रेत फायबर्स आढळतं ज्याने बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन यासारख्या आजारापासून मुक्ती मिळते. यात ऊर्जा प्रदान करणारे तत्त्वदेखील आढळतात. ज्याने आपल्यात दिवसभर स्फूर्ती राहते. याने अल्सरसंबंधी त्रासापासूनही मुक्ती मिळते.