गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

दही खाण्याची योग्य पद्धत

दही हा चांगल्या बॅक्टेरियांचा उत्तम स्त्रोत आहे. हाड आणि दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने दही लाभदायी मानलं जात. पण दही खाण्याचेही काही नियम आहेत. महत्वाची बाब म्हणजे रात्री दही खाऊ नका, असा सल्ला अनेकजण देतात पण तुम्ही दहीप्रेमी असाल तर दिवसाच्या कोणत्याही वेळी दही कसं खाव याबाबत जाणून घ्या. 
* दही भात कधीही खाता येईल. दहीभातामुळे पोटाला हलकं वाटतं. 
* दिवसा नुसतं दही खाल्लं तरी चालू शकतं. पण रात्री द्यात साखर किंवा मिरपूड घाला, यामुळे पचन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल. पचनसंस्थेला आराम आणि थंडावा मिळेल. 
* दह्याऐवजी ताकाचा पर्याय निवडा. 
* रात्रीच्या वेळी रायता खाता येईल. कांदा, काकडी, टोमॅटो आणि पुदिना घालून मस्त रायता करता येईल. 
ताकाची कढी हा सुद्धा चांगला पर्याय आहे. 
* कफ प्रवृती असेल आणि सर्दी होत असेल तर रात्रीच्या वेळी दही आणि इतर पदार्थ टाळणं योग्य ठरतं. 
आपल्या आरोग्यानुसार आहाराची निवड करा.