रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (08:52 IST)

श्रावणात मिळणारे हे फळ, आरोग्यासाठी आहे अमृत समान, जाणून घ्या फायदे

Pear
श्रावण महिना सुरु होताच नासपती हे फळ बाजारात मिळण्यास सुरवात होते. नासपती हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. जे रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवते. 
 
पावसाळ्यामध्ये विटामिन सी भरपूर फळे आणि भाज्या खाण्याचे सल्ले दिले जातात. कारण या ऋतूमध्ये आजार वाढत असतात. याकरिता योग्य खानपान असणे आवश्यक असते. श्रावणात आजाराचा धोका कमी करण्यासाठी नासपती मदत करते. यामध्ये व्हिटॅमिनसी शिवाय पोटॅशियम, फोलेट, कॉपर आणि मॅगनीज असते. जाणून घ्या फायदे.
 
नासपती खाण्याचे फायदे-
डायबिटीज करते नियंत्रित- नासपती डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर असते. नासपती मध्ये एंथोसायनिन असते. जे अँटीऑक्सीडेंटचे काम करते आणि डायबिटीज चा धोका कमी करते.  
 
हार्टसाठी फायदेशीर- नासपती मध्ये जे पोषकतत्वे असतात ते हृदयाला आरोग्यदायी ठेवतात. नासपती मध्ये प्रोसायनिडिन असते, जो एक अँटीऑक्सीडेंटचे काम करते. यामुळे हृद्यासंबंधित समस्या दूर होतात.   
 
सुजणे कमी करते- नासपती मध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते जे शरीराची सूज कमी करण्यासाठी मदत करते. तसेच नासपती मध्ये फ्लेवोनोइड्स अँटीऑक्सीडेंट असतात.
 
पाचनतंत्र बनवते मजबूत- नासपती मध्ये  भरपूर फाइबर असते. ज्यामुळे पोट आणि पाचन संबंधित समस्या दूर होतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर नासपती जरूर खावे.  
 
वजन कमी करण्यासाठी मदत करते- नासपती सेवन केल्यास वजन देखील कमी होण्यास मदत मिळते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे भूक कमी लागते. नासपती खाल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik