सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (14:11 IST)

हृदयविकाराचा झटका म्हणजे काय

heart attack women
सुश्मिताला हृदयविकाराचा झटका, हृदयविकाराचा झटका म्हणजे काय , त्यावर उपाय काय प्राथमिक उपचार काय आहेत?
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. वयाच्या ४५शीतही फिटनेसकडे विशेष लक्ष देणाऱ्या सुश्मिताला हृदविकाराचा झटका आल्याने तिच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचं सुश्मिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या आरोग्याबाबत माहिती दिली.त्यामुळे हृदयविकार पुन्हा चर्चेत आला आहे, हा विकार त्यबद्दल माहिती जाणून घेवूया.
 
त्यामुळे ४० टक्के पेशंटचे प्राण वाचू शकतात
हृदयविकारानंतर जगभरात जास्त मृत्यू पहिल्या एक दोन तासांत योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने होतात. त्यात चुकीचा सल्ला देणारे शेजारी असतात. हृदयविकाराचा झटका आल्यास सबंधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे व त्या दरम्यान प्रथमोपचार मिळणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ४० टक्के पेशंटचे प्राण वाचू शकतात.
 
 एखाद्या व्यक्तीच्या छातीत अचानक दुखणे व काही वेळातच पुन्हा बरे वाटणे म्हणजे साधा त्रास आहे, असे प्रत्येक वेळेस समजण्याचे कारण नाही. कधी कधी हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी काही संकेत येतात. पण आता बरे वाटते असे सांगत ती व्यक्ती घरी डॉक्टरला बोलावण्यास नकार देते. अशी लक्षणे असल्यास त्या व्यक्तीला एकटे सोडू नये. त्वरित अॅस्परिनची गोळी चावून गिळून टाकण्यास सांगावे. अगदी थोडेसे पाणी द्यावे. ज्यूस, सरबत, कोल्डड्रींक किंवा खाण्यास काहीही देऊ नये. यापुढील उपचार घरात होत नाहीत. त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. पेशंटला घाम येऊन कपडे ओले झाले असतील तर त्याचा अर्थ रक्तदाब कमी झाला आहे. या परिस्थितीत हाताची नाडी व्यवस्थित लागत नसेल तर सॉबीट्रेट ही गोळी देऊ नये. कारण या गोळीने रक्तदाब कमी होतो व जास्त हानी होते. ही गोळी दिल्यावर एकदम बरे वाटले तर संकट टळले असाही अर्थ काढू नये. पेशंटला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावे. सुरुवातीच्या ६० ते ९० मिनिटात उपचार न मिळाल्यास पेशंटचे खूप नुकसान होते.
 
हृदयविकार म्हणजे काय ?
हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
 
जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते मरते. ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
 
हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्‍या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) होतो व त्यामुळे पाऊलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.
 
हृदयविकार का होतो ?
आपण जसजसे मोठे होत जातो, शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
 
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो.
भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो.
ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
 
धूम्रपान करणे
मधूमेह
उच्च रक्तदाब
लठ्ठपणा
उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
शारिरीक श्रमाची कमतरता
अनुवंशिकता
तणाव, रागीटपणा आणि चिंता
वंशानुगत मुद्दे
 
डॉक्टरांना कधी भेटायचे?
जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा मळमळ किंवा थंड घाम येणे यासारखी इतर लक्षणे असतील तर त्याने ताबडतोब आपत्कालीन विभागात जावे. लक्षणे गंभीर असल्यास, डॉक्टर रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञ किंवा हृदयरोग तज्ज्ञांकडे पाठवू शकतात.
मेडीकवर हॉस्पिटल्समधील आमचे हृदयरोगतज्ज्ञ तुम्हाला सर्वोत्तम हृदयाची काळजी आणि उपचार प्रदान करतील
 
हार्ट अटॅकची कारणे
बहुतेक हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमनी रोगामुळे होतो. हृदयाच्या (कोरोनरी) धमन्यांपैकी एक किंवा अधिक कोरोनरी धमनी रोगामध्ये अवरोधित केले जातात आणि हे सामान्यत: कोलेस्टेरॉल-युक्त साठ्यांमुळे होते ज्याला प्लेक्स म्हणतात.
प्लेक्समुळे धमनी अरुंद होऊ शकते, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा मर्यादित होतो.
जेव्हा प्लेक तुटतो तेव्हा ते हृदयात रक्ताची गुठळी तयार करू शकते.
तथापि, हृदयातील कोरोनरी धमनीच्या संपूर्ण किंवा आंशिक अवरोधामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे जेव्हा इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG किंवा EKG) काही बदल (एसटी एलिव्हेशन) प्रकट करतो ज्यांना त्वरित आक्रमक उपचारांची आवश्यकता असते. तुमचे डॉक्टर हृदयविकाराच्या विविध प्रकारांचे वर्णन करण्यासाठी ECG डेटा वापरू शकतात.
 
मध्यम किंवा मोठ्या हृदयाच्या धमनीचा तीव्र एकूण अडथळा सामान्यतः एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) दर्शवतो.
आंशिक अडथळा वारंवार नॉन-एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (NSTEMI) सूचित करतो. NSTEMI असणा-या काही व्यक्तींना मात्र पूर्ण अडथळा असतो.
सर्व हृदयविकाराचा झटका अवरोधित रक्तवाहिन्यांमुळे येत नाही. येथे इतर कारणे आहेत:
 
कोरोनरी धमनी उबळ
धमनी सामान्यत: कोलेस्टेरॉल प्लेक्स किंवा धूम्रपान किंवा इतर जोखीम घटकांमुळे लवकर कडक होणे प्रदर्शित करते. कोरोनरी धमनीच्या उबळांना कधीकधी प्रिन्झमेटल एनजाइना, व्हॅसोस्पॅस्टिक एनजाइना किंवा वेरिएंट एंजिना म्हणून ओळखले जाते.
 
हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे ?
हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.
जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे.
जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी.
पाण्यात ढवळून अँस्प्रीन द्यावे.
 
हृदयविकारावर काय उपचार असतात ?
हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते.
पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.
हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षीत स्पंदने आढळली तर त्यावर ऊपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.
जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते.
कितेक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बाईपास सर्जरीचा ऊपयोग केला जातो.
हृदयविकारापासून बचाव कसा करता येतो?
 
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :
जीवन शैलीत परिवर्तन:
 
आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मिठ कमी असावे, फाइबर आणि जटिल कार्बोहाइड्रेट उच्च मात्रेत असावे.
वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.
शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.
 
पेसमेकर बद्दल
हृदयात एक वीजनिर्मिती केंद्र असते. त्याला एस ए नोड म्हणतात. त्यातून निर्माण झालेली विद्युत ऊर्जा एका विशिष्ट तार संस्थेतून प्रवास करते. हृदयाची स्पंदने साधारणपणे मिनिटाला ६० के १०० ठोके(हार्ट बीट) निर्माण करते. शारीरिक श्रमानंतर हे ठोके वाढतात. पण ज्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके खूप हळू पडतात त्याला कृत्रिम पेसमेकर शरीराच्या आत बसवण्याचा सल्ला दिला जातो. पेसमेकर मधून हृदयाच्या स्नायूंना उत्तेजन देते. ज्यामुळे नैसर्गिक ठोक्यांप्रमाणे हृदयाचे ठोके निर्माण होतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. हे यंत्र सामान्यपणे गळ्याजवळच्या हाडाच्या जवळील छातीच्या जवळील भागात डावीकडे किंवा उजवीकडे लावले जाते. त्याचा फायदा पेशंटना नक्कीच होतो.
Edited by : Ratnadeep Ranshoor