1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2023 (16:51 IST)

19 वर्षाचा तरुण डीजेच्या तालावर नाचता नाचता कोसळला, लग्नासाठी नातेवाईकाच्या घरी आला होता

19-year-old collapsed while dancing
तेलंगणातील नांदेडमध्ये एका तरुणाचा नाचताना अचानक मृत्यू झाला. लग्नात नाचणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गेल्या शनिवारी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी घडली. महाराष्ट्रातील रहिवासी असलेला मुट्यम हा हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या निर्मल जिल्ह्यातील पारडी गावात त्याच्या नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी आला होता.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मध्ये तरुण त्याच्या आवडत्या तेलगू गाण्यावर नाचताना दिसत आहे. 40 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काही वेळानंतर तो डान्स करताना अचानक जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे. लोकांना काही समजण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तेथे उपस्थित लोकांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.
 
तेलंगणात आठवडाभरात अचानक हृदयविकाराची चौथी घटना घडल्याचे समजते. जिथे लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध पडले. एका प्रकरणात ट्रॅफिक कॉन्स्टेबलने सीपीआर देऊन एका व्यक्तीला मृत्यूपासून वाचवले, तर दोन घटनांमध्ये दोघांना जीव गमवावा लागला.