शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (16:56 IST)

तोंडाचा वास येतो, या टिप्स अवलंबवा

बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की सकाळी उठल्यावर त्यांच्या तोंडाला वास येतो. रात्री ब्रश करून देखील सकाळी तोंडाला वास येतो.त्या मागील कारण असे की आपल्या तोंडात काही प्रमाणात बॅक्टेरिया असतात जे तोंड कोरड झाल्यामुळे झपाट्याने वाढतात.या मुळे वास येतो .आपण जेव्हा काही खातो तेव्हा तोंडात राहणारे बॅक्टेरिया लाळ एकत्र करतात आणि अन्न आणि प्रथिने तोडतात. या प्रक्रियेत सोडल्या गेलेल्या गॅस मुळे तोंडाचा  वास येतो.झोपण्यापूर्वी दात आणि जीभ स्वच्छ केल्याने तोंडाच्या वासाची समस्या कमी करू शकतो.बरेच लोक माऊथवॉश वापरतात, परंतु याचा प्रभाव तात्पुरतीच असतो. नंतर तोंडाला वास येतो.तोंडाला वास येणं हे हेलीटोसिस ची लक्षणे असू शकतात.हे तोंडाची स्वच्छता व्यवस्थित न केल्याने आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे असू शकते. तोंडाचा वास न येण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत,यांना अवलंबवून आपण वासावर नियंत्रण मिळवू शकता. चला तर मग जाणून घ्या.  
 
1 दररोज जीभ स्वच्छ करा-तोंडातून वास जीभ,दात आणि हिरड्यांवर साचलेल्या बेक्टेरियाच्या प्लाक मुळे येतो.म्हणून दररोज जीभ स्वच्छ करावी. दिवसातून दोन वेळा ब्रश करावे. 
 
2 दात स्वच्छ करण्यासाठी टूल किट ठेवा -दात स्वच्छ करण्यासाठी नेहमी आपल्यासह टूल किट ठेवा. या मध्ये दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश, जिभेच्या स्वच्छतेसाठी मेटल किंवा प्लास्टिकचा टंग क्लिनर आपल्या जवळ बाळगा.जेणे करून तोंडाची चांगल्या प्रकारे स्वच्छता होऊ शकेल. 
3 दोन दातांमध्ये स्वच्छता करा- काही ही खाल्ल्यावर अन्नकण दातात अडकून बसतात. अशा परिस्थितीतीत स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. काहीही खाल्ल्यावर गुळणा करावा.सकाळ संध्याकाळ दात स्वच्छ करा.
 
4 रात्री झोपेंतून उठून पाणी प्या-रात्री तोंड कोरड होत त्यामुळे लाळ कमी होते आणि बेक्टेरिया जास्त प्रमाणात उद्भवतात आणि तोंडाला वास येतो.बऱ्याच लोकांना नाका ऐवजी तोंडाने श्वास घेण्याची सवय असते या मुळे देखील तोंडातून वास येण्याची समस्या उद्भवू शकते.रात्री झोपेतून उठून पाणी प्यावे. 
 
5 योग्य आहार घ्या- ताजे फळे,भाज्या खाल्ल्याने दात आणि हिरड्या बळकट होतात. म्हणून आहारात याचे प्रमाण वाढावा. पोट स्वच्छ ठेवा. दिवसातून किमान 10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.