बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

स्त्रियांना पुरूषांपेक्षा जास्त झोपायला हवे

निरोगी आरोग्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. दिवसभराच्या थकव्यानंतरची शांत झोप तुम्हाला फ्रेश करते. किमान सहा ते सात तासाची झोप प्रत्येकाला आवश्यकच असते. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनातून महिलांना जास्त झोपेची गरज असल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या, याचे कारण....
 
महिला मेंदूचा खूप वापर करतात. यामुळे त्यांना झोपेची जास्त आवश्यकता असते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. महिलांच्या मेंदूचा झोपेवर कसा ‍परिणाम होता? याच म्यूनिखच्या मॅक्स प्लांक संस्थेच्या शास्त्रज्ञांनी 160 महिलांवर प्रयोग केला आहे. प्राध्यापक मार्टिन ड्रेसलर यांचे म्हणणे आहे की अशी अनेक कारणे आहेत, जी आपल्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम करतात. परंतू महिलांमध्ये हा परिणाम जास्तच असतो. पुरूषांच्या तुलनेत महिला कोणतेही काम करण्यासाठी अधिक मानसिक शक्तीचा वापर करत असल्याचेही ते म्हणाले. यामुळे त्यांना आपल्या मेंदूला शांत आणि सक्रिय ठेवण्यासाठी झोपेची जास्त आवश्यकता असते.