शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

पिंपल्सवर आयुर्वेदिक उपचार

मुखदूषिका या संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे चेहरा दूषित करणारे. यालाच पर्यायाने युवानपिडका म्हटले आहे. जास्त करून तारुण्यावस्थेत उत्पन्न होणा-या असल्यानेच त्यांना युवानपिडका किंवा तारुण्यपीटिका असेही म्हटले जाते. यालाच आपण पिंपल्स म्हणतो. आयुर्वेदिक औचारामुळे पिंपल्स पूर्णपणे बरे होऊ शकतात. 

पिंपल्सची कारणे...
मुखदूषिका उत्पन्न होण्याची मुख्यत: चार कारणे आहेत.

१) जेवणात तिखट, आंबट, खारट व मसालेदार पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे पित्त प्रकोेप होऊन मुखदूषिका उत्पन्न होऊ शकतात.

२) तारुण्यावस्थेत मुलांचे रक्त सळसळत असते. म्हणजेच रागाच्या भरात टोकाची भूमिका घेत असतात. त्यामुळे पित्त प्रकोप होऊन पिंपल्स होऊ शकतात.

३) बाजारात मिळणा-या सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर केल्यामुळे चेह-यावरील त्वचा खराब होऊन पिंपल्स येऊ शकतात.

४) प्रदूषित हवामानामधून धूलिकण चेह-यावर चिकटतात. चेह-यावर अतिप्रमाणात घाम आल्यामुळे डोक्यातील केसांमधील कोंडा चेह-याला चिटकून अस्वच्छतेमुळे पिंपल्स होऊ शकतात. 
कशी घ्याल काळजी?

WD
कशी घ्याल काळजी?

१)जेवणात हिरव्या भाज्या, पोळी, वरण-भात, दूध, तूप असा सात्त्विक आहार घ्यावा.

२)आपल्या मानसिक रोगावर नियंत्रण व संयम ठेवणे. त्याच प्रमाणात नेहमी आनंदी व शांत राहण्याची वृत्ती बाळगावी.

३)रात्रीचे जागरण टाळावे.

४)शक्यतो बाजारात मिळणा-या सौंदर्यप्रसाधनाचा वापर करू नये.

५)दर तासाला चेह-यावर पाणी टाकण्याची सवय करावी. याने चेह-याच्या त्वचेला ओलसरपणा मिळून चेह-याच्या त्वचेमध्ये जिवंतपणा येतो.

६)चेह-यासाठी वापरण्यात येणा-या स्कार्फ, रुमाल धूलिकणयुक्त असू नये. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतल्यास पिंपल्स पूर्णपणे बरे होऊन चेहरा सतेज होऊ शकतो.