3 Warning Signs of Heart Attack या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमचा जीव जाऊ शकतो
3 Warning Signs of Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्याची स्थिती इतकी धोकादायक असते की बहुतांश घटनांमध्ये रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. देशभरात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की हृदयविकाराचा झटका कधी आणि कुठे येतो हे कळणे कठीण झाले आहे. मात्र कोणताही आजार असो, कोणत्याही आजारापूर्वी आपले शरीर सिग्नल देते, जे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा आपले शरीर असे छोटे सिग्नल देते, ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. अनेक वेळा आपले शरीर हृदयविकाराच्या काही दिवस आधी सिग्नल देते जेणेकरून आपण खबरदारी घेऊ शकतो.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. हे संकेत आहेत-
1. छातीत अस्वस्थता जाणवणे - बहुतेक हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीच्या मध्यभागी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ अस्वस्थता येते. यामध्ये छातीत जडपणा, दाब किंवा अस्वस्थता देखील जाणवू शकते.
2. शरीराच्या वरील भागात अस्वस्थता जाणवणे- एक किंवा दोन्ही हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे ही देखील हृदयविकाराच्या झटक्याची संभाव्य लक्षणे आहेत, जी समजून घेणे आवश्यक आहे.
3. श्वास घेण्यात अडचण जाणवणे - जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा त्याशिवाय श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्याचे देखील हे लक्षण आहे.
हृदयविकाराच्या झटक्याची चेतावणी देणारी काही इतर सामान्य चिन्हे म्हणजे थंडी वाजून येणे, थंड घाम येणे, मळमळ होणे किंवा चक्कर येणे.
वृद्ध रुग्णांनी किंवा आधीपासून हृद्यासंबंधी आजाराने रोगी लोकांनी स्वत:कडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावे. याआधी कोणाला हृदयविकाराचा झटका आला असेल तर पुढे आरोग्याची काळजी कशी घ्यावी. हे जाणून घेणे देखील महत्तवाचे आहे. निरोगी राहण्यासाठी हे करावे-
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवारी घ्यावीत.
मनाने कोणतीह औषधे बंद करु नयेत.
उपचारांचा पाठपुरावा करत राहावा म्हणजेच वेळोवेळी तपासणी करत रहा.
वैद्यकीय सल्ल्याचे पालन करा.
अस्वीकरण: वर दिलेल्या माहितीची अंमलबजावणी करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या. वेबदुनियाकडून या माहितीवर दावा केला जात नाही.