शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पोटाची चरबी 7 दिवसात कमी करतील हे 5 पावलं

पोटाची चरबी आपला लुक तर बिघडवतेच वरून अनेक रोगांना निमंत्रणही देते. हल्ली मानसिक ताण अधिक असला तरी शारीरिक चालना नसल्यामुळे फॅट्सची समस्या घर करत आहे. यासाठी आम्ही देत आहोत 5 स्टेप ज्याने आपण सात दिवसात पोटाची चरबी कमी करू शकता.
 
पहिले पाऊल
पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे. क्रंचमध्ये पाय अगदी सरळ ठेवले पाहिजे. याने पोटाच्या मसल्सवर जलद परिणाम होतो. यानंतर कार्डिओ, मसल्स बिल्डिंग आणि अॅब्स एक्सरसाइज. आठवड्यात 20 मिनिट कार्डिओ एक्सरसाइज, 15 मिनिट मसल्स बिल्डिंग आणि 5 मिनिट अॅब्स एक्सरसाइज करायला हवी. रिव्हर्स क्रंच कोर मसल्स मजबूत करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम आहे.
दुसरा पाऊल
पोट कमी करण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन-सी आढळणारे पदार्थ जसे लिंबू, द्राक्ष, बोर आणि संत्रं सामील करा. कारण याने फॅट्स लवकर बर्न होतात आणि शरीराला शेप मिळतो. याव्यतिरिक्त गाजर, पत्ता कोबी, ब्रोकोली, सफरचंद आणि टरबूज इत्यादी शरीरातून पाणी आणि वसा शोषतात. हे सर्व करताना अधिक कॅलरी आढळणार्‍या पदार्थांपासून दूर राहा.
 
तिसरा पाऊल
दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री 6-8 तास झोप आवश्यक आहे. याहून कमी झोप आपल्या हार्मोन्सला फॅट्स साठवण्यासाठी प्रेरित करते. भरपूर झोप घेतल्याने सकाळी फ्रेश आणि हलकं जाणवेल.
 
चौथे पाऊल
ताण लठ्ठपणाचा मुख्य कारण आहे. या युगात बहुतेकच कोणी असेल ज्याला ताण नसेल कारण तणाव हल्लीच्या लाइफस्टाइलची देणगी आहे. ताण वाढल्यामुळे भूख लागते आणि अती खाण्यात येतं. आणि या उलट ताणामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया हळू होते. परिणामस्वरूप लठ्ठपणा वाढतो. 
 
पाचवे पाऊल
नियमित योग द्वारे आपण पोटाची चरबी कमी करू शकता. जसे धनुर आसन आणि पश्चिमोत्थालन आसन द्वारे आपले पोट कमी होईल.