गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (14:10 IST)

Healthy Tips: जेव्हा शरीरात मॅग्नेशियमची कमी असेल तेव्हा पूरक आहार घेऊ नका, संरक्षणासाठी हे उपाय करून बघा

नेहमी लोक शरीरात एखादे पोषक तत्त्व कमी झाल्याबरोबरच सप्लिमेंट घेणे सुरू करून देतात. आजकाल मॅग्नेशियमसाठीही असाच ट्रेड पाहायला मिळत आहे. मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट घ्यायला सांगण्यात येते ज्याने शरीरात मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण होऊन शरीरात स्फूर्ती येते. तसेच या सप्लिमेंटबद्दल विशेषज्ञांचे दुसरेच मत आहे. त्यांनी लोकांना चेतावणी दिली आहे की याचे सेवन डॉक्टरांच्या सल्लाशिवाय करू नये. त्यांचे मानणे आहे की बाजारात मिळणारे हे सप्लिमेंट शरीरात अॅलर्जीसोबत किडनीला देखील नुकसान करतात.   
 
ताण तणाव घेणे चुकीचे आहे  -
मानसिक तणावामुळे आमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमी अधिकच वाढू शकते. याच्या कमतरतेमुळे बेचैनी, अवसाद, हायपरटेंशन, मायग्रेन, अनिद्रा आणि मानसिक रोगांचे कारण बनतात.  
 
ह्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे -
- मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम सारखे सात खनिज तत्त्व स्वस्थ शरीरासाठी गरजेचे आहे  
- सुस्ती, एकाग्रतेत कमीचे कारण, स्वत: कुठले ही निष्कर्ष काढू नका  
- खनिज तत्त्वांची शरीरात अधिकता विषाक्तता उत्पन्न करते.  
 
या गोष्टींकडेे लक्ष द्या - 
- ऊन घेतल्यामुळे देखील कॅल्शियम-मॅग्नेशियमची भरपाई शक्य आहे   
- डॉक्टरच्या सल्लाबगैर कुठले ही मल्टी व्हिटॅमिन-मिनरल्स घेऊ नये 
 
ह्या वस्तूंचे सेवन करावे -
संतुलित भोजनाचे सेवन केल्यानं कदाचितच मॅग्नेशियमची कमी शरीरात होते. बदाम, काजू, फळ भाज्या, गहू, ब्राउन राईस, ओट्स केळी, सोयाबीन, ब्रोकोली योगर्ट, बटरमिल्क इतर दुग्ध पदार्थांना डाइटमध्ये सामील करा.
 
कमतरतेमुळे हे परिणाम -
हाड कमजोर होणे, भूक न लागणे, थकवा, स्नायू वेदना व वजनावर प्रभाव 
 
या गोष्टींकडे लक्ष द्या -
- 20-25 ग्रॅम मॅग्नेेशियम एक स्वस्थ वयस्क व्यक्तीच्या शरीरात असतो.  
- 420 ते 440 मिलीग्रॅम दररोज महिलांना याची गरज असते.    
- 320 ते 360 मिलीग्रॅम मॅग्नेेशियमचे पुरुषांना रोज गरज असते.